Maharashtra Winter Session 2025: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा सहावा दिवस असून आज अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात होणार आहे. उद्या रविवारी (दि. 14 डिसेंबर) सातव्या दिवशी अधिवेशन संपणार आहे. राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत असल्याने अधिवेशन आटोपते घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेत कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

Maharashtra Winter Session 2025: विधान परिषदेत आज काय महत्वाचं? 

1) संपूर्ण लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र या समाजातील इतर मागास प्रवर्ग यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल, अशी अट टाकण्यात आली. त्यामुळे केवळ 2 ते 3 टक्के लोकांना आरक्षणाचा फायदा होत आहे. बाकी सर्व लिंगायत समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे. ही जाचक अट रद्द करावी.  

2) तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात बंजारा समाज आदिवासी प्रवर्गात आहे. महाराष्ट्रात मात्र हा इतर मागास प्रवर्गात आहे. हे बदलण्यात यावे आणि बंजारा समाजाला देखील महाराष्ट्रात आदिवासी प्रवर्गात टाकावे. या बाबतची लक्षवेधी येईल. यावरु गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात आदिवासी समाजाने बंजारा समाजाच्या मागणीला तीव्र विरोध केला आहे. 

Continues below advertisement

3) नियम 93 अन्वये अनिल परब हे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बेच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले त्याचे मुंबई केले नाही हे चांगले केले या विधानाबाबत निवेदन करतील. यावरून सभागृहात गोंधळाची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी हा वाद गाजत असताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या नाराजी बाबत सरकार निवेदन करेल. 

4) राज्यात मॅट्रिमोनियल साईटच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग, आर्थिक गैरव्यवहार, बनावट प्रोफाइलद्वारे गुन्हेगारी प्रकार वाढत आहे. यावर नियंत्रण येण्यासाठी राज्यात तत्काळ मॅट्रिमोनी फ्रॉड सेल स्थापन करणे आणि तत्काळ केंद्र सरकारकडे ऑनलाइन मॅट्रिमोनियल सर्विसेस रेग्युलेशन नियमावली तयार करण्याची शिफारस करणे, याबाबत आमदार चित्रा वाघ नियम 97 अन्वये चर्चा करतील.

5) आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील 4 पत्रकारांविरोधात हक्कभंग मांडला होता. त्याचा अहवाल सभापती राम शिंदे यांना प्राप्त झाला आहे. सभापती आज अहवाल जाहीर करणार आहेत. 

आणखी वाचा 

Maharashtra Winter Session 2025: FDA ची थातूरमातूर कारवाई, भाजप आमदारांकडून वाभाडे; मंत्री नरहरी झिरवाळ हतबल; सभागृहात नेमकं काय घडलं?