Maharashtra Politics : गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील नेत्यांच्या (Maharashtra Politics) वयाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते. खासकरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या 84 व्या वर्षी देखील महाराष्ट्र पिंजून काढतात, याबाबत बोललं जातं. मात्र, दुसरीकडे त्यांचेच पुतणे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्यावर वयावरुन टीका करतानाही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.14) एका कारखान्याबाबत बोलताना ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना देखील वयावरुन टोला लगावला. "मी चांगलं काम करेल का?  85 वर्षाचा माणूस चांगलं काम करेल?" अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, आता महाराष्ट्रातील नेत्यांचं वय हे राजकीय टीका टिप्पणीचा विषय बनलंय तर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचं (Maharashtra Politics) किती वय आहे? हे जाणून घेऊयात... (Maharashtra Politics)

राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस एकाच वयाचे

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच वयाचे आहेत. दोघांचं वय 54 इतकं आहे. राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झालाय, तर देवेंद्र फडणीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झालाय. राहुल गांधी हे सध्या काँग्रेससाठी सर्वात महत्त्वाचे नेते आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद तीन वेळेस भुषवण्याचा पराक्रम केलाय. काँग्रेसने नेहमी राहुल गांधी यांच्याकडे देशाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिलंय. बऱ्याचदा त्यांचा उल्लेख तरुणांचा नेता किंवा यंग लिडर म्हणूनही केला जातो. 

अजित पवार आणि एकनाथ शिंदे अमित शाहांपेक्षा वयाने मोठे 

गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचा संपर्क वाढला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हापासून त्यांच्या कायम गाठी-भेटी होत राहिल्या आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाचा स्वीकार देखील केलेला पाहायला मिळालाय. मात्र, अमित शाहांचं राजकीय वजन जरी जास्त असलं तरी ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. अजित पवार यांचं वय 65 वर्षे आहे, एकनाथ शिंदे यांचं वय 61 वर्षे आहे तर अमित शाहांचं वय 60 इतकं आहे. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झालाय, एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी 1964 रोजी तर अमित शाह यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी झालाय. 

पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांपेक्षा केवळ 5 वर्षांनी लहान 

राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये यापूर्वी मोठे वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. 'सही करायला हाताला लकवा मारलाय का' हे शरद पवारांचं वक्तव्य राज्यभरात चर्चेत होतं. मात्र, अजित पवार जेव्हा शरद पवारांना सोडून गेले तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी गंभीर साथ दिली होती. मात्र,तुम्हाला हे माहिती आहे का की पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांपेक्षा वयाने केवळ 5 वर्षांनी लहान आहेत. शरद पवारांचं वय 84 इतकं आहे तर पृथ्वीराज चव्हाणांचं वय 79 इतकं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 17 March 1946 रोजी झालाय तर शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 चा आहे. 

उद्धव ठाकरे राज ठाकरेंपेक्षा वयाने 7 वर्षांनी मोठे 

सध्या महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. दोघांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेची निवडणूक लढली जावी, अशी इच्छा महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी बोलून देखील दाखवली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचे मोठे बंधू आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, त्यांचे दोघांमध्ये केवळ 7 वर्षांचा फरक आहे. उद्धव ठाकरेंचं वय 64 इतकं आहे, तर राज ठाकरेंचा आज (14) 57 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झालाय तर राज ठाकरेंचा जन्म 14 जून 1968 रोजी झालाय. 

नेता

वय 

जन्म तारीख 

शरद पवार 84
 
12 डिसेंबर 1940
 
उद्धव ठाकरे 64
 
27 जुलै 1960
 
पृथ्वीराज चव्हाण 79
17 मार्च 1946
अशोक चव्हाण 66 28 ऑक्टोबर 1958
अजित पवार 65 22 जुलै 1959
एकनाथ शिंदे 61 9 फेब्रुवारी 1964
नारायण राणे 73 10 एप्रिल 1952
बाळासाहेब थोरात 72 7 फेब्रुवारी 1953
हर्षवर्धन सपकाळ  57  10 जानेवारी 1968

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भाजपला सत्तेची सूज, ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा हल्लाबोल, म्हणाले भाजपला आभास निर्माण करण्याचा रोग

उदयजी विश्वासघात केला तर... आधी मंत्री सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे