Maharashtra Politicis News : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. येत्या 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असणार? मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 संभाव्य मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 7 ते 8 नावे आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्यासमोर सादर केली जाण्याची शक्यता आहेत.
अजित पवारांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेलांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक सुरु
प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीला पक्षाध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित आहेत. तसेच या बैठकीला पार्थ पवार देखील उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ शपथ विधी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. धनंजय मुंडे
2. अदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. हसन मुश्रीफ
5. धर्मराव बाबा अत्राम
6. अजित पवार
7. छगन भुजबळ
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं जाणार हे पाहणं महत्वाचं
राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर या तिघांसोबत एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आता समोर येत आहे. महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद (Maharashtra Cabinet) मिळण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. अनेकजण मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. अशातच भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं या मंत्रीमंडळात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. सर्वात जास्त मंत्रीपदे भाजपच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नेमकी किती मंत्रीपदं जाणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काही महत्वाची नावं समोर आली आहेत, यामध्ये आणखी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: