Deepak Kesarkar on Eknath Shinde, Mumbai : "आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध करुन दाखवलं. आता त्यांचा
कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, आम्ही ठरवणार नाहीत", असं सूचक वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, 5 तारखेला शपत विधी होणार आहे, पण अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहेत. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. प्रकिया लेट होतेय त्यात त्यांची काही भूमिका आहे. भाजपची निवड प्रकिया कधी व्हावी हा भाजपचा विषय आहे. तरी आज बैठक रद्द वैगरे ह्या बातम्या येत आहेत. आज कोणतीही बैठक नव्हती. त्यांची तब्बेत ठीक नाही. भाजपकडून जो काही निर्णय होइल तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे.
युतीची महायुती झाली. विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या. विरोधक आता वेगवेगळी कारण शोधत आहेत. शपथविधीची तारीख ठरली आहे तर काही गोष्टी विनाकारण बाहेर येत आहेत. काहीतरी तर्क काढायचा आणि बातमी बनवायची हे थांबलं पाहिजे. पक्षातल्या नेत्यांनी पण कमेंट करणं थांबवलं पाहिजे. आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. ज्या वेळी बैठक ठरेल तेव्हा ते इकडेही बसतील आणि दिल्लीलाही जातील. तीन पक्षाचं सरकार असतं तेव्हा चर्चा होतं असते. पण त्यामुळे नाराज आहेत वैगरे असं बोलणे चुकीचे. आमची एकच मागणी आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. ह्या विजयाला फार मोठं महत्व आहे. कारण आधी मतांची ध्रुवीकरण झालं होतं.
मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत. शुभ अशुभ दिवस आपण भारतात मानतो. आम्ही सगळ्यांसोबत एकत्र काम केल आहे. शिंदेचा मान महाराष्ट्रातला मान राखला जाईल. मी फडणवीसांना मेसेज केला. की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पाहाणी करायला एकच पक्ष जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. कळवळ असती तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो. मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही. पण जनतेने गैरसमज करु नये. आम्ही 100% एकत्र आहोत. भाजपचे अध्यक्ष एकटे पाहाणी करायला गेले.
इतर महत्त्वाच्या बातम्या