Sanjay Raut On Narayan Rane : खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नोटिशीबाबत ट्विटरवरुन संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.


राणेंनी माफी मागितली नाही तर मानहानीचा खटला दाखल करणार : राऊत


माणसाने भाजपच्या नादाला लागून किती खोटे बोलावे याला ही काही मर्यादा आहेत. नारायण राणेंनी सतत माझ्याविषयी काही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे


बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून आपणच निवड केली, राणेंनी हे सांगणे बाकी आहे; राऊतांचा टोला


संजय राऊत म्हणाले, नारायण राणे म्हणतात 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. नारायण राणे काहीही वक्तव्य करु शकतात. 2004 साली मी सामनाचा संपादक होतो. माझे मतदारयादीत नाव नाही असेही म्हणाले. आता 25 वर्षापासून मी मतदान करत आहे. माझे शिक्षण मुंबईत झाले. मी देशाचा नागरिक आहे. मला मतदानाचा हक्क आहे. 2004 साली देखील माझे नाव मतदार यादीत होते.






नारायण राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून संजय राऊत आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करत असतात. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्यामार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे, असे संजय राऊत म्हणाले.  


Sanjay Raut Full PC : बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं, जाणीव ठेवा; राऊत राणेंवर कडाडले



संबंधित बातम्या :


Narayan Rane on Sanjay Raut : मनसेच्या मेळाव्यातून नारायण राणे संजय राऊतांवर बरसले