Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी (Maharashtra Municipal Corporation Election 2026) राजकीय वातावरण तापलं आहे. 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

Continues below advertisement

निवडणुकांना अवघे 23 दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही महायुत्या (Mahayuti), महाआघाड्यांची (Mahavikas Aghadi) अधिकृत घोषणा झालेली नाही, जागावाटपचाचं त्रांगडं अजूनही कायम आहे. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रत लढतील असं चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मनपा असून याठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही खणाखणी सुरु आहे. ठाकरे बंधूंची युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे, पण घोषणा कधी याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. 

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची आज घोषणा होणार? (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance)

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची आज घोषणा होणार का याकडे लक्ष लागलंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे..शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला, तर एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर  भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहे तिथे रस्सीखेच सुरू आहे आणि जिथे पेच निर्माण झाला आहे, तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सोडवला जात आहे.

Continues below advertisement

महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम- (Municipal Corporation Election 2026)

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरनामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबरउमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंतअंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026मतदान- 15 जानेवारी 2026मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC Election 2026: मुंबई महापालिकेवर यंदा कोणाचा झेंडा, BMC निवडणुकीचा इतिहास, वॉर्ड, प्रभाग आरक्षण ते 2017 चा निकाल