Maharashtra Guardian Ministers List : राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची (Maharashtra Guardian Ministers List) यादी जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नेत्यांवर प्रत्यकी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणातील कलह टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना पालकमंत्री आणि सहपालकमंत्री घोषित केला. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर असणार आहेत. तर सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम पाहणार आहेत. दुसरीकडे मुंबई उपनगर या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे..दुसरीकडे याच जिल्ह्याचं सहपालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवले आहे..
धनंजय मुंडे हे सध्या परळीहून शिर्डीकडे निघाले आहेत..
उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत..
बीडच्या पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडे उद्या शिर्डीमध्ये प्रतिक्रिया देणार आहेत.
पालकमंत्रिपदाची संपूर्ण यादी
1. गडचिरोली - अजित पवार
2. ठाणे - एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे
4. पुणे - अजित पवार
5. बीड - अजित पवार
6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम - हसन मुश्रीफ
10. सांगली - चंद्रकांत पाटील
11. नाशिक - गिरीश महाजन
12. पालघर - गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ - संजय राठोड
15. मुंबई उपनगर - आशिष शेलार तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी - उदय सामंत
17. धुळे - जयकुमार रावल
18. जालना - पंकजा मुंडे
19. नांदेड - अतुल सावे
20. चंद्रपूर - अशोक उईके
21.सातारा - शंभूराज देसाई
22. रायगड - आदिती तटकरे
23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25.सोलापूर - जयकुमार गोरे
26. हिंगोली - नरहरी झिरवाळ
27. भंडारा - संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
29. धाराशिव - प्रताप सरनाईक
30. बुलढाणा - मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग - नितेश राणे
32. अकोला - आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
35. वर्धा - पंकज भोयर
36.परभणी - मेघना बोर्डिकर
विदर्भाच्या पालकमंत्रिपदाची वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवले...
मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली मध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांना सह पालकमंत्री म्हणून मदतीसाठी सोबत ठेवले आहे..
विदर्भातील सर्वात प्रमुख दोन्ही जिल्हे म्हणजेच नागपूर आणि अमरावतीचे पालकत्व भाजपचे वरिष्ठ व अनुभवी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे...
विदर्भातील एक मोठा जिल्हा म्हणजे यवतमाळ आणि यवतमाळ चे पालकमंत्री पद संजय राठोड यांच्याकडे गेले आहे... यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे आमदारांची संख्या पाहता अपेक्षा होती की भाजप यवतमाळचे पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवेल.. मात्र शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी गेली आहे...
वाशिम मध्ये हसनमुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे.. संजय राठोड यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले असते, तर भावना गवळी यांच्याकडून तीव्र विरोध झाला असता.. कदाचित त्यामुळेच संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्री पद देऊन वाशिम मध्ये पश्चिम महाराष्ट्राचे अनुभवी नेते हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे...
चंद्रपूरचे पालकमंत्री पद भाजपचे मंत्री अशोक उईके यांना देण्यात आले आहे.. अशोक उईके मुळात यवतमाळ जिल्ह्यातून आमदार आहे मात्र यवतमाळ मध्ये पालकमंत्री पद संजय राठोड यांच्याकडे गेल्यामुळे अशोक विके यांना शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात जावे लागले आहे...
बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद जाधव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे... (बुलढाणा जिल्ह्यातून भाजपचे आकाश फुंडकर मंत्री असतानाही आणि भाजपचे आमदारांची संख्या राष्ट्रवादी पेक्षा तिप्पट असतानाही आकाश फुंडकर यांना त्यांच्या गृह जिल्ह्यात पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकली नाही..)
भाजपचे आकाश फुंडकर यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे...
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा एकदा बाहेरचाच पालकमंत्री आला आहे... भंडाराचे पालकमंत्री पद भाजपचे संजय सावकारे यांना मिळाले आहे..
तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे... ( गोंदिया प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा असल्याने गेले अनेक वर्ष गोंदिया मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा आधार नसतानाही पालकमंत्री पद प्रफुल्ल पटेल यांच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिला आहे... पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे..
वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री पद वर्ध्यातून आमदार व गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना मिळाला आहे...
इतर महत्त्वाच्या बातम्या