Maharashtra Goverment Cabinet Decision मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (14 ऑक्टोबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे. या धोरण कालावधीत 50 हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे. राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 3 महत्वाचे निर्णय- (Maharashtra Goverment Cabinet Decision)

1. उद्योग विभाग

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर. धोरण कालावधीत 50 हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय.

2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद.

Continues below advertisement

3. विधि व न्याय विभाग-

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात 2 हजार 228 पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO: