Continues below advertisement

Maharashtra Election 2025 चंद्रपूर : राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळीनंतर आता मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला आहे. असे असलं तरी मतदानाच्या दिवशी हि निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. अनेक ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आमने- सामने येत तुफान राडा आणि मारहाणीच्या घटना घडल्याचे बघायला मिळालंय. अशीच एक घटना चंद्रपुरात घडली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. तर दुसरीकडे चंद्रपूरच्या गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडलीय.

चंद्रपूरच्या राजुरा शहरातील काल ( 2 डिसेंबर) संध्याकाळी हि घटना घडलीय. यात राजुरा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले राजेंद्र डोहे यांनी भाजप कार्यकर्ता गजानन कुलकर्णी यांना केली मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना घडलीय. निवडणुकीत मदत केली नाही, या कारणासाठी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर कारवाईसाठी ठिय्या मांडला. राजुरा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगळे देखील पोलीस स्टेशनमध्ये यावेळी उपस्थित होते. या प्रकरणात सध्या पोलीस कारवाई सुरू असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Continues below advertisement

Chandrapur Gadchandur Evm: मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना

दुसरीकडे चंद्रपूरच्या गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडलीय. प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील हि घटना आहे. राम दुर्गे असं ईव्हीएम मशीन (EVM) फोडणाऱ्या मतदाराचे नाव असून "नगारा" या चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचा आरोप आहे. पोलिसांनी राम दुर्गे याला ताब्यात घेतलं आणि नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

Buldhana : बोगस मतदान करताना पाच जण पकडले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य बळाचा वापर

बुलढाणा शहरातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बोगस मतदान करणाऱ्यांना पकडले व चांगला चोप दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी जमावला पंगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा देखील वापर केला. सकाळपासून बुलढाणा शहरात अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे विविध पक्षाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते धावपळ करताना दिसत होते. यामुळे मोठा गोंधळ सुद्धा शहरात दिसत होता.

बुलढाणा - 54.20%चिखली - 71.02%खामगाव - 70.65%मलकापूर - 74.04%मेहकर - 74.41%शेगाव - 68.98%सिंदखेड राजा - 85.08%लोणार -72.26%नांदुरा - 74.59%जळगाव जामोद - 67.87%------------------------------बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण 69.42%मतदान झालं आहे.

आणखी वाचा