Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होईल. मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. 


अशातच वर्ध्यात मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार? याची उत्सुकता साऱ्यांना लागली होती. आमदार समीर कुणावार आणि आमदार पंकज भोयर हे दोन्ही आमदार सलग तीनदा विजयी झाले आहे. त्यामुळे वर्ध्याला मंत्रिपद मिळणार, अशी अपेक्षा असताना आमदार पंकज भोयर यांच्या नावाची मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या यादीत समावेश आहे, त्यांना तसा फोन आला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली आहे. त्यामुळे वर्ध्याला एक मंत्रिपद निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे.


कोण आहेत आमदार पंकज भोयर?


- सन 2014 मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश
- भाजपच्या तिकिटावर वर्धा विधानसभा येथे 2014 मध्ये आमदार म्हणून विजयी
- सन 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव करीत विजय
- सन 2024 च्या निवडणूकीत काँग्रेसचा पराभव करून विजय
- सलग तीनदा निवडून येत वर्धा विधानसभा क्षेत्रात निर्माण केले वर्चस्व
- तिन्ही वेळा काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा पराभव केला
- पी एच डी पर्यतचे शिक्षण
- वर्ध्यात विविध शिक्षण संस्था


वर्धा


डॉ. पंकज भोयर (भाजप) : 92,067 मते  


शेखर शेंडे (काँग्रेस) : 84, 592 मते 
डॉ.सचिन पावडे(अपक्ष) : 8728 


विजय उमेदवार : डॉ. पंकज भोयर (भाजप)


2019 चे आमदार : डॉ. पंकज भोयर (भाजप) 


आतापर्यंत भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-


नितेश राणे 
शिवेंद्रराजे भोसले 
चंद्रकांत पाटील 
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा 
गिरीश महाजन 
जयकुमार रावल 
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे, 
अतुल सावे


आतापर्यंत शिवसेनेकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-


भरत गोगावले
उदय सामंत 
प्रताप सरनाईक 
योगेश कदम
आशिष जैस्वाल
गुलाबराव पाटील 
शंभूराजे देसाई
प्रकाश आबीटकर
संजय राठोड


संबंधित बातमी: