आइकिया या जगातील सर्वात लोकप्रिय व विश्वसनीय होम फर्निशिंग्ज ब्रँडने ग्राहक खरेदी अनुभव अधिक सोईस्कर व स्थिर करण्यासाठी 365 दिवस एक्स्चेंज अँड रिटर्न पॉलिसी लाँच केली आहे. होम फर्निचर व फर्निशिंग अॅक्सेसरीज अशी उत्पादने त्यांच्या मूळ पॅकेजिंग किंवा असेम्बल स्थितीत आइकियाकडे बदलली जाऊ शकतात किंवा परत केली जाऊ शकतात. या सेवेसह ग्राहक फिटिंग, आरामदायीपणा व कार्यक्षमतेसंदर्भात त्यांच्या घरी चाचणी करू शकतात. एक्स्चेंज व रिटर्न्सचा समावेश असलेल्या नवीन ‘चेंज ऑफ माइण्ड' पॉलिसीसह आइकिया ग्राहक समाधान व विश्वासाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे.
सुस्पष्ट व सोप्या सुविधा देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली एक्स्चेंज अँड रिटर्न पॉलिसी ग्राहकांना उत्पादनांची खरेदी कुठेही केलेली असो स्टोअरमध्ये किंवा सोईस्कर होम कलेक्शन सर्विसेसच्या माध्यमामून उत्पादने बदलण्याची किंवा परत करण्याची सेवा देते. ही पॉलिसी सहसा उद्योगामध्ये दिसून न येणारी स्थिरतेची अद्वितीय सेवा देत आइकियाला इतरांपेक्षा वरचढ ठरवते.
ही अधिक स्थिर एक्स्चेंज अँड रिटर्न पॉलिसी लाँच करत आइकियाचा भारतातील होम सोल्यूशन्समध्ये पसंतीचा ब्रँड म्हणून कायम राहण्याचा मनसुबा आहे, जेथे ब्रँड सतत विकसित होत असलेल्या रिटेल क्षेत्रामध्ये सुलभता व समाधानासंदर्भात ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करत आहे. कलेक्शनप्रती जागरूक संशोधन करत आम्ही ग्राहकांसाठी शाश्वत रिझॉल्यूशनला चालना देतो. आइकिया फॅमिली सदस्यांसाठी ही पॉलिसी अधिक पुढे जाते, जेथे खरेदीच्या १४ दिवसांच्या आत सेल्फ डिलिव्हरी किंवा सेल्फ असेम्ब्लीदरम्यान नुकसान झालेल्या उत्पादनांसाठी मोफत रिप्लेसमेंट्स असे फायदे दिले जातील.
कंट्री कमर्शीयल मॅनेजर आदोश शर्मा म्हणाले, “८० वर्षांपासून आइकिया उच्च दर्जाची, टिकाऊ उत्पादने देत आहे, जी घरामध्ये सर्वोत्तम दैनंदिन जीवनाचा अनुभव देतात. आमची नवीन ३६५ दिवस एक्स्चेंज अँड रिटर्न पॉलिसी आमच्या प्रयत्नांचे विस्तारीकरण आहे, जी भारतातील ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासोबत त्यांना सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये खरेदी करायची असो या उपक्रमामधून खात्री मिळते की ग्राहकांना त्यांच्या निवडींबाबत विश्वास वाटेल. पहिल्यांदाच योग्य उत्पादनाचा शोध घेणे सोपे करत आणि ‘डेमोक्रॅटिक डिझाइन' वरील आमच्या फोकसची खात्री घेत आम्ही ग्राहक समाधानाला अधिक उत्साहित करत आहोत. आमचा उत्पादन बदलण्याची व परत करण्याची प्रक्रिया विनासायास आणि सोईस्कर करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ग्राहक त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत त्यांच्या पसंतीनुसार घर डिझाइन करू शकतात.''
ही नवीन पॉलिसी ग्राहकांना खरेदीच्या किंवा डिलिव्हरीच्या तारखेपासून एका वर्षामध्ये उत्पादने बदलण्याची किंवा परत करण्याची सेवा देते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या घरांसाठी योग्य निवड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. खरेदीच्या पुराव्यासह ग्राहक न वापरलेले, काहीशी वापरलेली किंवा असेम्बल केलेले आणि विक्री करण्यायोग्य स्थितीत असलेली उत्पादने बदलू शकतात आणि परत करू शकतात. यामध्ये सर्व आइकिया उत्पादनांपासून स्टोअर्समध्ये खरेदी केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. तसेच, कंपनी मॅट्रेसेस, अॅज-इज सेक्शन व मीटर फॅब्रिक्ससाठी विस्तारित ३६५ दिवस एक्स्चेंज कालावधी देते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरी उत्पादनांची चाचणी करण्याची सुविधा मिळते.
आइकिया इंडियाचे कंट्री कस्टमर मॅनेजर अॅलेक्झांड्रा शेस्ताकोवा म्हणाले, “कल्पना करा की तुम्ही तुमच्या घरासाठी सोफा किंवा मॅट्रेस खरेदी केले, महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ वापरानंतर त्यामधून आरामदायीपणा मिळत नाही आहे. बहुतांश केसेसमध्ये अशी उत्पादने जोपर्यंत टिकून राहतात तोपर्यंत वापरावी लागतात. पण, आम्ही आइकियामधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी यामध्ये बदल करण्याचे नियोजन केले आहे. आमचे स्टोअर्स आणि सर्व इतर ऑफलाइन व ऑनलाइन चॅनेल्सवरील विनासायास खरेदी अनुभवाला अधिक उत्साहित करत, तसेच उत्पादने परत करण्याची व क्लेम्स प्रक्रिया सोपी करत आम्ही ग्राहकांना आमचा दर्जा आणि स्थिरतेची खात्री देतो, जे त्यांची घरे व मूल्यांना अनुकूल आहेत. आमच्या सर्व ग्राहकांना आता ३६५ दिवसां मध्ये आमच्या सर्व शॉपिंग चॅनेल्सवर उत्पादने बदलण्याची किंवा परत करण्याची सेवा उपलब्ध आहे. ही पॉलिसी आइकिया इंडियाचे दर्जा खात्रीबाबत धाडसी पाऊल आहे, तसेच ग्राहकांसोबत दृढ विश्वास निर्माण करण्याचा आमचा मार्ग आहे.''
आइकिया इंडियाने पसंतीची ओम्नी चॅनेल होम फर्निशिंग्ज रिटेलर बनण्याचा आपला प्रवास सुरू ठेवला आहे, तसेच ग्राहकांना सोईस्कर व आनंददायी अनुभव देत आहे.