नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आज पत्रकार परिषद घेत आहे. निवडणूक आयोग आजच्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर विधानसभा (Jammu And Kashmir Election) निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. याशिवाय हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryanaa Vidhansabha Election) घोषणाही निवडणूक आयोग करणार आहे. महत्वाचं म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणूक ही नेहमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी एकत्रच होत आली आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhansabha Election 2024) कार्यक्रम जाहीर करणार का याबाबत उत्सुकता आहे. 


एकीकडे निवडणूक आयोग तयारी करत असताना, महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय झालं होतं ते पाहू.


एकूण 288 जागांसाठी निवडणूक


महाराष्ट्रात याआधीची विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhansabha Election 2019) ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती. 


2019 सालच्या निवडणुकीचा निकाल काय?


भाजपा- 105


शिवसेना (अविभाजित)- 56


काँग्रेस-44


राष्ट्रवादी (अविभाजित)-54


महायुती, महाविकास आघाडीचा निकाल काय? (Maharashtra Vidhansabha Election Result 2019)


महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)


महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)


2019 सालचा निवडणूक कार्यक्रम


निवडणूक आयोगाने 2019 साली सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या होत्या. त्यावेळी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तर 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2019 होती. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर होती.  


2014 सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 


2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. त्या निवडणुकीत भाजपाने एकूण 122 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला तेव्हा 63 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 42 जागांवर बाजी मारली होती. तर  राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 41 जागा मिळाल्या होत्या.


हेही वाचा :


महाराष्ट्रासोबत होणाऱ्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार, निवडणूक आयोग आज तारीख जाहीर करणार!


Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी