मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे वाहू लागले आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे राज्याच्या राजकीय पटलावरदेखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांतील आजी-माजी आमदारांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. नेतेमंडळी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. असे असतानाच आता सोलापूरच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत आहे. माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे (Baban Shinde) हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेदेखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी बबन शिंदे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्या या भेटसत्रामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
बडे नेते शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार समर्थक असलेले माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे दाखल झाले आहेत. भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, शरद पवारांच्या भेटीला आल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच राजन पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती.
लोकसभेच्या निकालामुळे नेत्यांचा कल बदलला?
अजित पवारांसोबत असणारे आमदार, माजी आमदार आणि लोकप्रतिनिधी शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचं लोकसभेतील स्ट्राईक रेट असण्याची शक्यता आहे. पक्ष सोडून गेलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात शरद पवार अनेक युवकांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले पदाधिकारी
माढा -अजित पवार गटाचे आमदार व नगरसेवक, आमदार बबन शिंदे माढा विधानसभा मतदारसंघ
भोसरी - भोसरीचे माजी आमदार विलास लांडे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला. त्यांनी मागील आठवड्यातदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नडे आदी नगरसेवक विलास लांडे यांच्यासोबत आले आहेत.
आष्टी - पाटोदा - आष्टी पाटोदा येथील शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख राम खाडे हे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात रिंगणात उतरणार असल्याने तेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.
अकोले : अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे अमित भांगरे आईसह शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. अमित भांगरे अकोला विधानसभेतून आमदार किरण लहामटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत, तेदेखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.
हेही वाचा :