Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक चांगल्या योजना आणल्या. अडीच वर्ष जनतेची सेवा केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील बंगल्यावर बैठक सुरू होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा अद्भुत प्रयोग आमचे नेते शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवासी, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष शरद पवार यांनी एकत्रित केले. गेले अडीच वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक चांगल्या योजना आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला.''
जयंत पाटील पुढे म्हणाले की, ''आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भाषण करून लोकांशी संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एक सरळ, चांगला आणि लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेला महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला होता. त्यांनी त्यांचं शेवटचं भाषण मुख्यमंत्री म्हणून करत असताना सर्वांचे आभार मानले. आज मंत्रिमंडळात देखिल त्यांनी सर्वांचे आभार मानले. येणाऱ्या काळात सर्वाना सोबत घेऊन काम करू ही भूमिका देखिल त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात शरद पवार यांनी बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली. महाराष्ट्रात शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार राहिले पाहिजे, टिकले पाहिजे, हा प्रयत्न केला.''
इतर महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadanvis : मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा; जिद्द, संयम, डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले? Inside Story
Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द
Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया