सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत प्रादेशिक पक्षाबाबत केलेल्या विधानावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. गांधी-नेहरु यांची विचारधारा असलेले प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येतील, असा आशयाचे शरद पवारांचे विधान असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली. त्यानंतर, राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. आता, शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलनीकरण करणार असल्याचं मी म्हणालोच नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. त्यावर, बारामती, माढा (Madha) सातारा येथील निकाल अनुकूल असल्याचंही पवार यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याबाबत शरद पवारांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मी असे म्हणालो नाही, असं मी म्हणालो नाही, अशा शब्दात पक्षाचं विलनीकरण करण्यावर शरद पवारांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष जवळपासून 2000 पासून आजपर्यंत एकत्र काम करत आहेत. आम्ही एकत्र काम करत आहोत. मंत्री मंडळातही एकत्र होतो. मागच्यामंत्री मंडळात एकत्र काम केले आहे. आम्ही विचारधारा एकत्र आहे, एकत्रित काम करणे हे दोघांनाही पटल्यामुळे आम्ही काम करत आहोत, असे म्हणत शरद पवार यांनी मुलाखतीनंतर झालेला संभ्रम दूर केला आहे.
पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
1. लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप झाले, आजपर्यंत बारामती मतदारसंघात पैसे वाटप कधीच झाले नव्हते, ही नवीन कन्सेप्ट येतेय, त्यावरही एकत्र बसून विचार व्हायला हवा, असे शरद पवार यांनी म्हटले.
2. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, असे गृहमंत्री अमित शहा म्हणतात त्याला काहीही अर्थ नाही. मुरारजी देसाई तेंव्हा देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांचे नाव पंतप्रधानासाठी पुढे केले नव्हते, असा दाखलही पवारांनी दिला.
3. भारतीय जनता पक्षाचे जेथे जेथे त्यांच राज्य आहे, जेथे त्यांचे शक्ती स्थान आहे. अशा अनेक ठिकाणी बुथ कॅप्चरींग व गैरप्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. महाराष्ट्रातही आल्या आहेत, निवडणूक आयोगाने याची नोंद घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
4. शिवसेना विलिनीकरणाबाबत मी बोललो नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे, ते सहकारी म्हणून काम करतात, त्यांच अस्तित्व स्वतंत्र आहे, असे उत्तर अजित पवारांनी केलेल्या आरोपावर शरद पवार यांनी दिले.
5. अडानी-अंबानी यांनी काळा पैसा काँग्रेसला दिल्याचे मोदींनी म्हटले. त्यावर, शरद पवारांनी अदानी-अंबानी हे आजपर्यत कोणाचे दोस्त आहेत, याची देशात चर्चा होते. ज्यांच्या बद्दल चर्चा होते ते आता काँग्रेसवर ढकलत आहेत, असे उत्तर शरद पवारांनी दिले.
6. मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, असे अजित पवार म्हणाले. यावर, देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर, मला याबाबत माहिती नाही, असे पवारांनी म्हटले.
7. शरद पवार हे नेते आहेत, असे अजित पवार काळजीपोटी म्हणाले - यावर मी काय सांगणार. निवडणूक प्रचार किंवा इतर गोष्टीसाठी मला कोणीही त्रास देत नाहीत. माझ्या जवळचे लोक प्रेमाणे माझ्याशी वागतात. पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते,असे उत्तर पवारांनी दिले.
8. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याबाबत शरद पवारांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मी असे म्हणालो नाही, असं मी म्हणालो नाही, अशा शब्दात पक्षाचं विलनीकरण करण्यावर शरद पवारांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली.
9. राज ठाकरेंच्या सभेंबाबत विधान
पुण्यात 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज ठाकरे यांची एकत्रित सभा होत आहे. या अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मोदींना कुणाची ना कुणाची मदत हवी आहे, यावरुन त्यांचा आत्मविश्वास कोठे गेलाय हे दिसत आहे. ते राज ठाकरेंची मदत घेतात हे सरळ सरळ दिसत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
10. चंद्रकांत पाटील यांनी चुटकी वाजवून तुमच्यावर टीका केली, असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी हात हलवून चला, द्या सोडून असे म्हटले.