Madha Lok Sabha Election:  शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या सूचनेनंतर गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांचे बंड थंडावले  आहे. शरद पवार यांनी तातडीने डॉ. देशमुख यांना तातडीने बारामती येथे बोलावून घेतले होते . रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी समजूत घातल्यावर अनिकेत यांचे बंड थंड झाले आहे . डॉ. अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहण्याची घोषणा  केली आहे. रात्रीत शरद पवार यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड थंड केले आता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत.  


पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याच्या राजकरणात  माढा आणि तिढा जणू काय नवीन समीकरणच बनले आहे. माढ्यातील तिढे काही संपण्याचे नाव घेत आहे. एक तिढा सुटत नाही तर दुसरा तिढा समोर येतो. अखेर शरद पवारांना एक तिढा सोडवण्यात यश आळे आहे. अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा  निर्णय  घेतल्याने शेतकरी कामगार पक्षाचे या माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. 


काल रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांनी डॉ देशमुख यांची भूमिका समजावून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले . यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते . यानंतर आज सकाळी ABP माझाशी बोलताना डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपल्या मनातील सामाजिक आणि राजकीय अडचणी पवार याना सांगितल्यावर त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याचे सांगितले . यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनीही सांगोल्यासाठी पुढील पाच वर्षात काय करणार आणि काय करायला पाहिजे याबाबत डॉ देशमुख यांच्याशी चर्चा केली . या बैठकीत समाधान झाल्याने आज सकाळी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून आता महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे डॉ अनिकेत देशमुख यांनी माझाशी बोलताना सांगितले . 


अनिकेत देशमुखांच्या नावाची होती चर्चा


 माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याच्या अगोदर डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. जेव्हा उमेदवार नव्हता तेव्हा शरद पवार यांनी आमच्या नावावर चर्चा सुरू केली होती. पण निष्ठावंत उमेदवार असताना भाजपकडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली, असं अनिकेत देशमुख म्हणाले होते.


एका रात्रीत  शरद पवारांनी सोडवला तिढा


दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. अनिकेत देशमुख  यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र शरद पवारांनी एका रात्रीत त्यांची नाराजी दूर केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यश आले आहे.  


हे ही वाचा :


धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्र्याचा मुलगा हाती घेणार कमळ, आज होणार पक्षप्रवेश