मुंबई : लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि शेवटचा टप्पा आज 1 जून रोजी पार पडत असून शेवटच्या टप्प्यात आज मतदान (Voting) होत आहे. आजच्या मतदानानंतर विविध संस्था आणि माध्यम समुहांच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून अंदाजे निकाल जाहीर होईल. त्यामध्ये, देशात एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडीत कोण बाजी मारेल याचा कौल लक्षात येईल. जनतेच्या मनातील कौल सांगण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे, एक्झिट पोलच्या (Exit poll) आकडेवारीकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, महाराष्ट्रातील 48 लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले. त्यामध्ये, एकूण 60.78 टक्के मतदान झालं आहे. या मतदानाच्या टक्केवारीनुसार नेमका कोणत्या पक्षाला फायदा होईल. महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी कोणाला लाभ मिळेल, हे 4 जून रोजीच समजेल. मात्र, एक्झिट पोलवरुन त्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान पहिल्या टप्प्यात झालं आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदान झालं आहे. तिसऱ्या टप्प्यात पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढली असून 63.55 टक्के मतदान झाले. तर, चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरुन 59.64 टक्के मतदान झालं आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात ही टक्केवारी आणखी घसरली असून पावच्या टप्प्यात सर्वात कमी 54.33 टक्के मतदान झालं आहे. देशातील 5 व्या टप्प्यातील मतदानाची सरासरी 60.39 टक्के आहे. तर, महाराष्ट्रातील एकूण 5 टप्प्यातील मतदान 60.78 टक्के आहे.
48 मतदारसंघ निवडणूक टक्केवारी
पहिला टप्पा
भंडारा गोंदिया 67.04चदपूर 67.55 गडचिरोली-चिमूर 71.88नागपूर 54.32रामटेक 61.01
दुसरा टप्पा
वर्धा 64.85अकोला 61.79अमरावती 63.67बुलढाणा 62.03हिंगोली 63.54नांदेड 60.94परभणी 62.26यवतमाळ-वाशिम 62.78
तिसरा टप्पा
बारामती 59.50सोलापूर 59.19माढा 63.65सांगली 62.52सातारा 63.16कोल्हापूर 71.59हातकणगले 71.11 रत्नागिरी-सिंधुदुर्ग 60.51उस्मानाबाद 63.88लातूर 62.59
चौथा टप्पा
नंदूरबार 70.68जळगाव 58.47रावेर 64.28जालना 69.18औरंगाबाद 63.03मावळ 54.87पुणे 53.54शिरुर 54.16अहमदनगर 66.16शिर्डी 63.03बीड 70.92
पाचवा टप्पा
धुळे 56.61दिंडोरी 62.66नाशिक 57.10पालघर 61.65भिवंडी 56.41कल्याण 47.08ठाणे 49.81मुंबई उत्तर 55.21मुंबई उत्तर पश्चिम 53.67मुंबई उत्तर मध्य 51.42मुंबई उत्तर पूर्व 53.75मुंबई दक्षिण 49.50मुंबई दक्षिण मध्य 51.88
दरम्यान, आज सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल येत आहेत.