Dharashiv Lok Sabha Constituncy : धाराशिव : छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या (Udayanraje Bhosale) पाठोपाठ आता आणखी एक उमेदवार भाजपच्या (BJP) चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे. धाराशिवची (Dharashiv) जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मिळण्याची शक्यता आहे. या जागेवर माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. मात्र, परदेशींनी घड्याळ चिन्हावरच लढावं, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसकडून घालण्यात आली आहे. तर प्रवीण परदेशींची मात्र भाजपच्या चिन्हावर लढण्याला पसंती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये पाच जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या जागांपैकी धाराशिव ही महत्त्वाची जागा असणार आहे. केल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणार कोण उतरणार? याची चाचपणी सुरू आहे. भाजपच्या वतीनं आपण कुठेतरी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत. भाजपकडून आपण निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत, अशी भूमिका यापूर्वीच प्रवीण परदेशींनी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळणार असेल, तर धाराशिवमधून जो कोणी उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असेल, त्यांनं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी अट अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घातल्याची माहिती मिळत आहे. 


छत्रपती उदयनराजे भोसलेंनंतर आता हा दुसरा उमेदवार आहे, ज्यानं राष्ट्रवादीच्या घड्याळावर न लढता, भाजपच्या कमळावर लढण्याची आग्रही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत धाराशिवच्या जागेवर काय निर्णय होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


जागावाटपासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक 


आज दुपारी महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला नाशिक, बारामती, शिरुर, रायगड आणि पाचवी जागा धाराशिवची असण्याची शक्यता आहे. याच बैठकीत धाराशिवच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ठाकरेंची साथ सोडून तुमच्यासोबत आलोय, शिंदे गटातील नेत्यांची उघड नाराजी; सर्व्हेच्या नावाखाली भाजप गंडवत असल्याचा आरोप