हिंगोली : शिवसेना एकनाथ शिंदे (Shiv Sena Eknath Shinde) यांच्या गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil Hingoli) यांना पुन्हा एकदा हिंगोलीतून (Hingoli Lok Sabha) उमदेवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 मार्चला 8 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यानंतर हेमंत पाटील यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला.  हेमंत पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले. 


हेमंत पाटील म्हणाले, "मी मनापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी सगळ्यांनी माझी शिफारस केली होती. निश्चित विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास  सार्थ ठरवेल, जो मोदींचा नारा आहे 400 पार चा त्यामध्ये निश्चित हिंगोलीचा एक आवाज असेल"


मोदी, योगी ते मुख्यमंत्री हिंगोलीत  


दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते हिंगोलीत येणार असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हिंगोलीमध्ये येणार आहेत. त्यांच्या  दोन सभा होणार आहेत.  मोठ्या ताकदीने शिवसेनेची सर्व टीम मैदानात उतरणार आहे. ही जागा जिंकून आणायची हाच आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा हिंगोलीत होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते हिंगोली जिल्ह्यात प्रचारासाठी येणार आहेत" असं हेमंत पाटील यांनी सांगितलं. 


सर्व आमदारांशी चर्चा


माझं सर्व आमदारांशी बोलणं झालं आहे. सर्व आमदारसुद्धा प्रचारात सहभागी झालेले आहेत. उमरखेडचे आमदार नामदेव ससाने, किनवटचे भीमराव किराम साहेब, काल माझी तानाजी मुटकुळे साहेब यांची मुंबईमध्ये भेट झाली. सर्वजण आजपासून कामाला लागलेले आहेत, असं हेमंत पाटील म्हणाले.


ही लढाई आहे ती हिंदुत्वाची लढाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला देश जगामध्ये एका वेगळ्या स्थानाकडे घेऊन चालले आहेत. हेच उलट ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे नेतृत्व नाही, कार्यक्रम नाही, दिशा नाही, अशा दिशाहीन लोकांच्याविरोधात ही लढाई आहे. निश्चित ही लढाई मी जिंकणार आहे, असा विश्वास 
हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. 


Hemant Patil Video :  हेमंत पाटील नेमकं काय म्हणाले?



संबंधित बातम्या 


शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, हिंगोलीतून पुन्हा हेमंत पाटील, तर मुंबईतून राहुल शेवाळेंसह आठ उमेदवारांची घोषणा