Krishnaraaj Mahadik: नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिलांवरील लैंगिक शोषण प्रकरणाने खळबळ उडाली आहे. कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिला व तरुणींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार, आर्थिक छळ तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नाशिकमध्ये 9 गुन्हे दाखल झाले असून आता भाजप युवा मोर्चाने या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवले आहे. त्यात या प्रकरणी सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करा, महिला सुरक्षेसाठी प्रभावी अंतर्गत यंत्रणा सुरक्षा हवी, जुन्या व नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करा, धर्मांतराचा दबाव, शारिरीक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
तर कृष्णराज महाडिक यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, नाशिकच्या कंपनीमधून एक अत्यंत वाईट घटना समोर आली आहे. तिथल्या मॅनेजमेंटमधल्या काही लोकांनी महिलांचे लैंगिक शोषण केले तसेच धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. भाजप युवा मोर्चाने या विषयावर आवाज उठवून त्या कंपनीवर आंदोलन केले. मी स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलेले आहे की, या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी.
Krishnaraaj Mahadik: तो निरोप तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा
मी कंपन्यांना देखील सांगत आहे की, तुमच्या मॅनेजमेंटमध्ये जे काही असे लोक असतील त्यांना तुम्ही तत्काळ कामावरून काढून टाकले पाहिजे. मी महिलांना आवाहन करतो की, असे कुठलेही ठिकाण असेल जिथे तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर तो निरोप तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. भारतीय जनता पक्षाकडून महिला सक्षमीकरणासाठी आमची ताकदीने काम करण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले.
Nashik IT Company Conversion Case: नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिला व तरुणींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार, आर्थिक छळ तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. एका पीडित महिलेने धाडसाने तक्रार केल्यानंतर प्रकरण समोर आले आणि त्यानंतर आणखी नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात तौसिफ अत्तर, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी यांना अटक करण्यात आली असून, पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी गुन्ह्यांमध्ये संबंधित आरोपींना पुन्हा अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
