Sai Kharade : कोल्हापूर शहराच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड होत आहे. कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे (Sai Kharade) यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. ठाणे येथे पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सई खराडे यांच्या पक्ष प्रवेश होणार आहे.
सई खराडे यांच्या प्रवेश कार्यक्रमात कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर देखील उपस्थित राहणार आहेत. सई खराडे यांच्यासोबत चिरंजीव शिवतेज खराडे यांचा देखील शिंदे गटात प्रवेश होणार आहे. सई खराडे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले असून, 2005 साली महापौरपद भूषविले आहे.
Sai Kharade : कोल्हापूरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार
सई खराडे यांनी यापूर्वी शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. कृषिभूषण कै. महिपतराव उर्फ पापा बेंद्रे यांच्या कन्या असणाऱ्या खराडे या माजी नगराध्यक्ष कै. सखारामबापू खराडे यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणावर महत्त्वाचा प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे. राज्य आणि जिल्हास्तरीय शिवसेना नेत्यांसह उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष ठरत असून, सई खराडे यांच्या प्रवेशानंतर शिंदे गटाचे स्थान कोल्हापूरमध्ये अधिक बळकट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या