Kolhapur News: बदललेल्या निसर्ग च्रकामुळे बेभरवशाची शेती झाली असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात आता चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 20 ते 25 सहकारी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने सहकारी संस्थांचे कंबरडे अक्षरश: मोडलं आहे. एका ट्रान्सफॉर्मरची किंमत बाजारभावाने पंधरा लाखांच्या घरात आहे. दुसरीकडे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यानंतर पोलिसांकडे तक्रार द्यायचं म्हटलं तरी, पोलिस तक्रार घेत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था न्याय नेमका मागायचा तरी कोणाकडे? अशी स्थिती झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर, शिरोळ, हातकणंगले पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यामधील शेतकरी ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. संस्था सुद्धा कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहेत.  दुसरीकडे, महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला मात्र चोरांनी एकदा सुद्धा हात लावलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा शंकेची पाल चुकचुकली आहे. 

Continues below advertisement

पीकांवरही विपरित परिणाम

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलसिंचन योजना राबवल्या आहेत. या योजना राबवताना काही किमीचे अंतर असते. त्यामुळे विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत. मात्र, ट्रान्सफॉर्मरच चोरीला गेल्याने शेतीचा पाणीपुरवठा खंडित होच चालला आहे. त्यामुळे संस्थांचे कंबरडे मोडले असतानाच शेतीचा पाणीपुरवठा खंडित पीकांवरही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर चोरट्यांची छडा लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

ट्रान्सफॉर्मरमधून चोरट्यांना काय मिळतं?

  • ट्रान्सफॉर्मरमध्ये कोपर म्हणजे तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापर असतो
  • 280 KV पासून 1200 KV पर्यंत ट्रान्सफॉर्मर असतात
  • 280 KV ट्रान्सफॉर्मरमध्ये अडीचशे किलो कॉपर वापरले जाते
  • ट्रान्सफॉर्मरमध्ये 250 किलो पासून 1 हजार किलो पर्यंत कॉपरचा वापर केला जातो
  • एक किलो कॉपर म्हणजे तांब्याची किंमत 1200 रुपये आहे
  • त्यामुळे 280 KV चा लहान ट्रान्सफॉर्मर चोरल्यावर चोरट्यांचा आरामात 3 लाख मिळतात
  • ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल आणि इतर साहित्याच्या चोरीतून मिळणारे पैसे वेगळेच

100 kV ते 1000 kV उच्च-दाब ट्रान्सफॉर्मरची अंतर्गत रचना कशी असते?

1) लोखंडी कोर (Core)

  • विशेष सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यांपासून बनवलेला असतो.
  • हे पातळ तुकडे केल्याने उष्णता आणि ऊर्जा वाया जाणे कमी होते.

2) वाइंडिंग्स (कॉइल्स)

  • तांबे किंवा अॅल्युमिनियमच्या तारा
  • त्यावर कागद किंवा इतर इन्सुलेशन
  • यांना तेलात बुडवले जाते जेणेकरून उष्णता कमी होईल आणि विद्युत सुरक्षितता मिळेल.

3) तेल (Oil)

  • ट्रान्सफॉर्मर थंड ठेवते.
  • आतल्या कॉइल्सना विद्युत इन्सुलेशन देते.

4) बुशिंग (Bushings)

  • बाहेरून ट्रान्सफॉर्मरमध्ये उच्च-दाब कनेक्शन देण्यासाठी वापरलेले पोर्सेलिन किंवा इपॉक्सीचे भाग.

5) टॅप चेंजर (OLTC)

  • लाईनवरील व्होल्टेज कमी-जास्त झाल्यास, ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज संतुलित ठेवण्यासाठी टर्न्स रेशो बदलणारी यंत्रणा.

6) कंझर्वेटर टँक

  • तापमान वाढले तर तेल फुगते, त्यासाठी तेलाचा साठा ठेवणारा टँक.

7) रेडिएटर्स

  • ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी लावलेले पंखे/जाळी.
  • ONAN / OFAF सारख्या थंडकरण पद्धती वापरल्या जातात.

8) सुरक्षा प्रणाली 

  • आत काही बिघाड झाला तर लगेच सूचना देतात किंवा ट्रान्सफॉर्मर बंद करतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement