Junaid Durrani, Parbhani : "पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही स्वगृही परतण्यास तयार आहोत. उद्या जर आम्हाला उमेदवारी नाही भेटली तर आमची अपक्ष लढवण्याची तयारी आहे, पण महायुतीतून निवडणूक लढणार नाहीत. हे आमचं स्पष्ट आहे", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे पुत्र जुनेद दुर्रानी यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि.25) बाबाजानी दुर्रानी यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर जुनेद दुर्रानी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बाबाजानी दुर्रानी काय म्हणाले?
आमचे आणि जयंत पाटलांचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत. ते घनसावंगीवरुन परभणीला जात असताना त्यांनी फोन केला की मी चहा प्यायला येत आहे. मी म्हणालो, चहा नको जेवनच करा. जेवन करुन पुढे जावा. त्यानंतर ते म्हणाले मी संध्याकाळी जेवन करुन जातो. आमचे संबंध असल्यामुळे मीडियामध्ये चर्चा होत असते. आमच्या दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचे संबंध आहेत. मी शरद पवारांसोबत 1985 पासून आहे, असं बाबाजानी दुर्रानी म्हणाले.
जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्रानी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री बंद दाराआड चर्चा
अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी घरी जयंत पाटील दाखल झाले आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना उधान आलंय. बाबाजानी दुर्रानी अजित पवार गटाचे विद्यमान परभणी जिल्हा अध्यक्ष आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य देखील आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Jagtap : पुरंदर-हवेलीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची शिवतारेंच्या उपस्थितीत बैठक, आमदार संजय जगताप संतापले, थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार