Jitendra Awhad on EVM : "दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जिण्याखाली एका खोलीत ईव्हिएम (EVM) मशीन सापडले. जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हिएम (EVM) आले तर ते 100 evm मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात. हे ईव्हिएम राहिले कसे? हे कुठले ईव्हिएम आहे? ईव्हीएमचा घोटाळा होतोय.  ईव्हीएम बदलले जातात याबद्दल मनातली साशंकता आहे", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 


माझं मत कुणाला गेले हे कळलच नाही


जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, त्या निकालाशी मी फारसा सहमत आहे, असं नाही.  मला माझं मत कुठे गेलंय हे कळलच पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? माझं मत कुणाला गेले हे कळलच नाही, तर शंका निर्माण होणारच ना की माझं मत नक्की कुठे गेले.  या संशयामुळेच अमेरिकेतल्या ईव्हीएम मशीन काढून घेतल्या. आपल्या देशाची लोकसंख्या आहे मत मोजायला चार दिवस लागतील पण मनात संशय राहणार नाही.  तक्रार कशाला करू? काय होतंय इलेक्शन कमिशन कडे तक्रार करून? असे सवालही आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.


सगळे जाऊन सलमान खानला भेटून आले


इथे मला लॉरेन्स भीष नाही. बँक कडून फोन आला पण एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला नाही. किती गांभीर्याने बघतात बघा तेच सलमान खानच्या घरी गोळीबार झाला, तर सगळे जाऊन सलमान खानला भेटून आले. सलमान सोबत फोटो निघू शकतो. माझ्यासोबत कोण फोटो काढेल. ते सर्व काम ज्याचा आहे त्यांनी करावा मी लक्षात आणून द्यायचं काम केलेलं आहे, असंही आव्हाड यांनी नमूद केलं. 


शरद पवार यांचं घर फोडल चोरी केली


पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, यांनी शरद पवार यांचं घर फोडल चोरी केली, दरोडा टाकला. लटकवलेली चावी कोण नेत ? आमच्या घड्याळ कोणी चोरलं? निवडणूक आयोग, क्लीन चीट याबद्दल कशाला चर्चा करता महाराष्ट्रात सगळ्यांना माहित आहे की, वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी ही बीजेपी आहे. वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की, एक लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला, असंही आव्हाड म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Abhijeet Patil and Shikhar Bank : इकडं अजितदादांना क्लीनचीट, तिकडं शरद पवारांच्या सभेत असतानाच अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई