Jitendra Awhad on Ajit Pawar : ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार? अशी घणाघाती टीका शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली आहे. माझं कुटुंब सोडून पवार घराण्यातील सर्वजण माझ्याविरोधात प्रचार करतील, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाषणाची वेळ आली की, अजित पवार बाथरुममध्ये असायचे. तुम्हाला हिंदी-इंग्रजी बोलता येत नाही, या तुमच्या कमतरता होत्या. कधी समोर येऊन सांगितल्या नाहीत. तू शरद पवारांच्या भावाचा मुलगा होता, म्हणूनच उपमुख्यमंत्री झाला. अरे काय काका का? का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, असं मी अमोल कोल्हेंना काल सांगितले होते. अजित पवार महाराष्ट्रात तुम्ही काय केलं सांगा. कोणता क्रांतीकारक निर्णय घेतला सांगा. सामान्य माणसाला तुमच्यासमोर येण्याचे धैर्य नाही. सुप्रिया सुळेंकडे प्रत्येकजण येऊन सेल्फी काढतो. तुम्हाला लोक घाबरतात.
सत्ताधाऱ्यांच्या टीपांवरती मांडणी करणारे अजित पवार होते
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, स्वत:ची तुलना शरद पवारांशी करु नका. तुम्ही त्यांच्यापुढे सेंटीमीटरही नाहीत. आजही असे पुतणे आहेत, जे काकासमोर मान वरतीही करत नाही.पवारांच्या कुटुंबियांत विष कोणी टाकायला सांगितले तुम्हाला, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले कोणामुळे अर्थमंत्री झाली. हे सर्वांना माहिती आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर आम्हाला टोकाची भाषा वापरली जायची. भाषणे करायला अभ्यास लागतो. विरोधी बाकांवर तुम्हाला तुमचा पीए भाषणं लिहून देत होता. सत्ताधाऱ्यांच्या टीपांवरती मांडणी करणारे अजित पवार होते. सत्ताधारी अडचणीत येणार नाहीत, त्यांच्यासाठी हे प्रयत्न करत होते.
माझं शरद पवारांवरती बापापेक्षा जास्त प्रेम , जितेंद्र आव्हाड
मी एक सिडकोचे एक प्रकरण काढले होते. त्यावेळी वेगळाच विषय काढला आणि आमचा विषय मागे टाकला. तुम्ही याचे उत्तरे द्या. सरकारसाठी अजित पवारांनी पदाचा वापर केला. 1991 मध्ये कोणामुळे निवडून आलात. दरवेळी शरद पवार तुमच्यासाठी शेवटची सभा बारामतीमध्ये घ्यायचे. प्रचंड बहुमताने निवडून आणा, असं शरद पवार आव्हान करायचे. ब्लॅकमेल करायचे सोडून द्या. मराठा आंदोलनावेळी तुम्हाला लोकांनी बारामतीमध्ये येऊन देत नव्हते. माझं शरद पवारांवरती बापापेक्षा जास्त प्रेम आहे.
Jitendra Awhad on Ajit Pawar : ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार?
इतर महत्वाच्या बातम्या