Sangli: विधानसभेपूर्वी काढलेली लाडकी बहीण योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली . मात्र निकालानंतर सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरली असल्याचं बोललं जातंय .या योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणायचं कुठून असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडलाय . दरम्यान,घराघरात घुसून महिलांचे लाडक्या बहिण योजनेसाठी अर्ज भरण्यात आले. असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय . ज्या महिलांचे नावे लाडकी बहीण मधून कमी झाले त्या महिलांसाठी आता जनांदोलन उभे करावे लागणार आहे .असेही जयंत पाटील म्हणाले .(Jayant patil)


राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू देत आपण आपल्या मतदारसंघात तयारी सुरू करावी असे निर्देश जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिलेत .गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सरकारच्या तिजोरीतील खडखडाटामुळे वादाच्या भोवऱ्यात आहे . दरम्यान, घराघरात घुसून महिलांचे लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज भरण्यात आल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला .


काय म्हणाले जयंत पाटील ?


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू देत.. आपण आपल्या मतदारसंघात तयारी सुरू करावी... पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकासाठी आतापासूनच उमेदवार तयार ठेवा तसेच महानगरपालिका आणि नगरपालिकेसाठी देखील आपण आता तयार राहिलं पाहिजे. असे निर्देश जयंत पाटलांनी दिले.सांगली जिल्ह्याला संघर्ष नवा नाही, कठीण परिस्थिती देखील या जिल्ह्यातील कार्यकर्ते पक्षासोबत आहेत सरकारकडून महामंडळाची घोषणा करण्यात आली होती परंतु एकही महामंडळ करण्यात आलेलं नाही .17 वेगवेगळ्या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. परंतु आज संक्रात मात्र यांना काही दिलं नाही.महामंडळ निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील कुठेही दिलेलं नाही. सरकार ओबीसी महामंडळाच्या नावाखाली कंपन्या चालवत आहे .ओबीसी समाजाला निवडणुकीपुरतं आश्वासन दिले गेले .समस्त ओबीसी समाजाला अस्वस्थ करून त्यांचे प्रश्न घेऊन आपण महाराष्ट्रासमोर गेले पाहिजे.महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत .निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला, सळसळत्या रक्तात याचा परिणाम झाला. खर तर पढेगे तो बढेगे हा नारा दिला पाहिजे.पण आज देशाला पढेंगे तो बढेंगे या घोषणाची गरज आहे .जग पृथ्वी इंटेलिजन्स वर चालले आहे तर आपण बटेंगे तो कटेंगे यावर चाललोय .किती आमदार आले आणि किती आमदार गेले हा प्रश्न महत्त्वाचा नाही. घराघरात घुसून महिलांचे लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज भरण्यात आले , ज्या महिलांचे नावे लाडकी बहीण मधून  कमी झालेत त्या महिलांसाठी आता जनआंदोलन उभे करावे लागेल.शेतकरी , तरुणाच्या प्रश्नावर आंदोलन उभारावे लागेल,मी आणि आर आर पाटील असताना जिल्ह्यात दुसरा कोणताही पक्ष सत्तेत येत होता.रोहित पाटील यांनी युवकांचे संघटन करून युवकांचे प्रश्न सोडवावेत, असेही ते म्हणाले.