Jay Malokar's Mother Reaction after Raj Thackeray Meets, Akola : काही आठवड्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ठाकरेंचे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी थेट अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड केली होती. मात्र, या तोडफोडीच्या घटनेनंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी अकोला येथील निवासस्थानी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. दरम्यान, राज ठाकरेंनी भेट घेतल्यानंतर जय मालोकारच्या आईने मोठा दावा केलाय.
जय मालोकारची आई काय काय म्हणाली?
जय मालोकारची आई म्हणाली, राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी त्यांचं कर्तव्य केलं. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, पण आमचा तर जीव गेला. त्यांनी आम्हाला त्यांचं काम सिद्ध करुन दाखवावं. हे लक्षात आलं पाहिजे. आमचा मुलगा घरुन जाताना सांगून जात नव्हता तर नाराजी कशाची घेता? तो घरुन निघून जायचा सांगत नव्हता. त्यादिवशी गेला. तसा वापसंच आला नाही. अॅटॅक असता तर रिपोर्टमध्ये आलं असतं, रिपोर्टमध्ये तसं काहीचं नाही. त्याच्यासोबत काय घडलं हे आम्हालाच माहिती नाही. त्याच्यासोबत घातपात झालाय.
जय यांच्यासोबत घातपात झाल्याचा गंभीर आरोप
जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होते. याबरोबरच जय मालोकर हा परभणी येथे होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्य तिसऱ्या वर्षाला शिकत होता. आमदार मिटकरी यांच्या गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर यांचं नाव होतंय. दरम्यान, जय यांच्यासोबत घातपात झाल्याचा गंभीर आरोप जय मालोकारांच्या आईने केलाय.
जय मालोकर यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे आणि मनसेप्रती आभार व्यक्त केले
आमदार मिटकरी यांच्या गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर यांच नाव होतंय. त्याच तणावातून जय यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आधी जय मालोकार यांच्या कुटुंबियाची मनसे नेते अमित ठाकरे यांनी 1 ऑगस्टला त्यांच्या निंबी मालोकार गावात जात भेट घेतली होती. या भेटीनंतर जय मालोकर यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे आणि मनसेप्रती आभार व्यक्त केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या