Lok Sabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाकडून एकूण 17 उमेदवारांची लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर घोषणा करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर ते  आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. उन्मेष पाटील (Unmsh Patil) यांच्या  नाराजीनंतर  त्यांच्या पत्नी संपदा पाटील (Sampada Patil) या  शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार राहणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियासह काही माध्यमात होऊ लागल्या असल्या तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मात्र या शक्यतेचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.  


जळगाव लोकसभेत  शिवसेना  ठाकरे गटाकडून संपदा पाटील लढवणार निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पसरू लागल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नाही.  भाजपाला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी खासदार उन्मेष पाटील समर्थकांची मागणी आहे. 


भाजपाने उन्मेष पाटलांचा पत्ता कट केल्याने समर्थक नाराज


भाजपाचे उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने  ते  आणि त्यांचे समर्थक नाराज दिसत आहे. जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी केले मात्र त्यांना यश मिळाले नाही.  उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून  स्मिता वाघ यांना  उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष  पाटील सह त्यांचे कार्यकर्ते भाजपावर नाराज झाले. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी पक्षावर कुठल्याही नाराज नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 


भाजप बैठकीला उन्मेष पाटील गैरहजर


आठ दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जळगांव येथे घेण्यात आली.  या बैठकीमध्ये देखील उन्मेश पाटील हे गैरहजर दिसून आले . याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एसएमएस आलेला नाही त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही.  तिकीट डावल्याने एकदाही उन्मेश पाटील हे जळगाव शहरात भाजपाच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठीसाठी आलेले नाही यामुळे त्यांची नाराजी उघड दिसून आली आहे.


 महाविकास आघाडीकडून प्रबळ उमेदवारचा शोध 


भाजपाने उमेदवारी नाकारल्याने उन्मेष पाटील मागील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.   मातोश्री दरबारात महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचेही नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले असल्याच सांगण्यात येते.  उन्मेष पाटील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडून दुजोरा मिळू शकला नाही जळगाव लोकसभेत महाविकास आघाडी कडून भाजपाला तगडे आव्हान देण्यासाठी प्रबळ उमेदवारचा शोध  महाविकासआघाडी कडून घेण्यात येत आहे.


भाजपाने तिकीट नाकारल्यापासून विद्यमान खासदार उमेश पाटील हे भाजपाच्या संपर्कात नाही मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दोन वेळा संपर्क केला असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते.  त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  त्यामुळे खरोखर उन्मेष पाटील हे भाजपाच्या संपर्कात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे भाजपाला आव्हान देण्यासाठी उमेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरविणार असल्याचेही चर्चा सुरू आहे


 संपदा पाटील या चाळीसगाव तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत विविध महिलांचे सामाजिक उपक्रम माझ्या माध्यमातून त्यांची चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओळख देखील निर्माण झाली आहे.  त्यातच विद्यमान खासदार उमेश पाटील यांच्या पत्नी असल्याने जळगाव जिल्ह्यात त्या बऱ्यापैकी परिचित आहे. यामुळेच महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल अशी खा उन्मेष पाटील यांच्या समर्थकांना आशा आहे. या सगळ्या बाबत खा उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र संपदा पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कडून निवडणूक लढवावी यासाठी   प्रयत्न करावा अशी समर्थकांची इच्छा असल्याचं खा उन्मेष पाटील यांच्या  निकटवर्तियानी माहिती दिली आहेय त्यामुळे आगामी काळात खरच खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या  उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार राहतील का हाच चर्चेचा विषय बनला आहे.


हे ही वाचा :


मोठी बातमी : मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही तर...., अंबादास दानवेंचं खळबळजनक वक्तव्य!