Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमधील विविध विकासकामांच उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार होतं. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरहजेरी लावल्याने भाजपा आणि आयुक्तांमधील वाद त्याचबरोबर शिंदे आणि फडणवीस मधील असंतोष ही दिसून आला आहे. त्यात कार्यक्रमस्थळी भाजपाच्या माजी नगरसेवकांना सोडलं नसल्याने भाजपानं ठिय्या आंदोलन करुन, आयुक्त हेतू परस्पर भाजपाविरोधी भूमिका घेत असल्याचा थेट आरोप केला आहे.    


मीरा-भाईंदरमधील विकास कामाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवल्याने दिवसभर मीरा-भाईंदरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मंगळवारी मीरा-भाईंदर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा-भाईंदरमधील स्केटींग रिंग लोकार्पण, चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराणा प्रताप पुतळ्याच अनावरण, नवीन नाट्यगृहाचे लोकार्पण तसेच नवीन रुग्णालय इमारतीच भूमिपूजन आणि महानगरपालिकेचे नवीन प्रशासकीय भवनाच भूमिपूजन, असे शहरातील महत्त्वाच्या विकास कामाच भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा होता. उद्घाटनाच्या आगोदरच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी रुग्णालय आणि नवीन पालिकेच्या प्रशासकीय भवनाची जागा बाबत आक्षेप नोंदवला होता. 


मीरा-भाईंदरच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणारे देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमाला येणार होते. तसेच निमंत्रण पत्रिकेत नाव ही छापण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं. सह्याद्री अतिथीगृहावर विविध सरकारी बैठक असल्यामुळे कार्यक्रमाला गेलो नसल्याचं फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. मात्र मीरा-भाईंदरचे प्रशासक दिलीप ढोले यांच्या नियुक्तीवरून एक याचिका हायकोर्टात आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांचा देखील नाव आहे. आता काही दिवसापूर्वी बदल्या झाल्या. त्यात फक्त मुंबई आणि मीरा-भाईंदरचे आयुक्त बदलले गेले नाहीत. बाकी सर्व बदलले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस शिंदेंवर नाराज ही आहेत, असं बोललं जात आहे. त्यात दिलीप ढोले मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे भाजपाला हवं तसं सहकार्य करत नसल्याने, पालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ही खंत देवेंद्र फडणवीस यांना बोलून ही दाखवली. देवेंद्र फडणवीस हे दिलीप ढोले यांची बदली करण्यासाठी आग्रही असताना. शिंदे मात्र त्याकडे कानाडोळा करत असल्याची सलं फडणवीस यांना सलतं असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आज मंगळवारी भाजपाच्या माजी नगरसेवकांना आत सोडलं नाही. त्यामुळे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे आणि माजी नगरसेवकांनी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या गेटसमोरच ठिय्या आंदोलन केलं. मात्र फडणवीसांच फोन आल्यानंतर आंदोलन मागे घेतलं. प्रशासनाने हेतू परस्पर हे कृत्य केल्याचा आरोप करुन, मेहतांनी भाजपाचे पदाधिकारी आयुक्ताबद्दल नाराज असल्याच मान्य केलं आहे.