Coastal Road Inauguration: मुंबई : वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) कोस्टल रोडचं (Coastal Road) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रम सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) दोघेही उपस्थित असणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, आज पार पडणाऱ्या कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) या मविआतील तीन महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं छापण्यात आलेल्या पत्रिकेवर या तिघांचीही नावं नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हे तिन्ही नेते उपस्थित राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
कोस्टल रोड वरळी ते मरिन ड्राईव्ह असा असणार आहे. वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत. तसेच, विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या तिनही नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच, कोस्टल रोड हा मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प आहे. मनपाच्या वतीनं छापण्यात आलेल्या पत्रिकेवर ठाकरे गटाचे स्थानिक आमदार, खासदारांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार कोस्टल रोडच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे, वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे.
कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?
एकूण 10.58 किमीचा मार्ग असलेला हा कोस्टल रोड आहे. यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या 4 आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये 3 + 3 अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण 4.35 किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही 2.19 किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.19 किमी इतकी आहे.
- मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे.
- प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे.
- एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
- यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
- कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :