Amit Shah Karnataka Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आपल्या सीमेवर छेडछाड करणाऱ्यांवर भारत अमेरिका आणि इस्रायलप्रमाणे कारवाई करू शकतो, असे कर्नाटकमधील एका सभेत ते म्हणाले आहेत. यावेळी शाह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख देखील केला. शाह म्हणाले की, पूर्वी जेव्हा पाकिस्तान समर्थित दहशतवादी हल्ले करत होते, तेव्हा भारत फक्त निवेदन जरी करत होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून परिस्थिती सुधारली आहे.


अमित शाह म्हणाले की, “पूर्वी अमेरिका आणि इस्रायल हे दोनच देश असे होते, जेव्हा त्यांच्या लष्कराला डिवचण्याचा प्रयत्न केलास ते प्रत्युत्तर देत होते. पण आता भारतही पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे या गटात सामील झाला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2016 मध्ये उरी आणि 2019 मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ले झाले आणि आम्ही 10 दिवसांच्या आत पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले केले, असे अमित शाह म्हणाले.


गृहमंत्री म्हणाले, "काही लोक विचारतात की या (सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक) चा काय परिणाम झाला? मी त्यांना सांगतो की याचा मोठा परिणाम झाला आहे. भारतीय सीमेवर कोणीही छेडछाड करू शकत नाही, अन्यथा चोख प्रत्युत्तर दिले जाईल, हे आता संपूर्ण जगाला माहीत आहे.'' ते म्हणाले की, कलम 370, 35-अ आणि नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासारख्या अनेक समस्या वेळेत सोडवण्यात आल्या आहेत.


शाह म्हणाले, ''5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कलम 370 रद्द केल्यास रक्तपात होईल, असे लोक म्हणत होते.पण साधा खडाही टाकण्याचे धाडस कोणी दाखवले नाही, रक्तपाताची बाब सोडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करून काश्मीरला उर्वरित भारताशी जोडले आहे.''


इतर महत्वाच्या बातम्या: