Kumar Vishwas Security: केंद्र सरकारने कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सुरक्षा Y श्रेणीवरून Y+ करण्यात आली आहे. आता त्यांना देशभरात Y+ श्रेणीची सुरक्षा मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने त्यांची सुरक्षा वाढवली आहे.


कुमार विश्वास यांना आतापर्यंत गृह मंत्रालयाने Y श्रेणीची सुरक्षा दिली होती. Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर CRPF कमांडो त्यांच्यासोबत असतील. कुमार विश्वास यांच्यासोबत सशस्त्र पोलिसांचे 11 कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये 5 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी त्यांच्या घराच्या परिसरात राहणार आहेत. यासह 6 PSO 3 शिफ्टमध्ये त्यांचे संरक्षण करतील.


दरम्यान, पंजाब निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. केजरीवाल खलिस्तानींना पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कुमार विश्वास म्हणाले होते की, केजरीवाल यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर त्यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. लोक त्याला फोन आणि मेसेज करून धमकावत आहेत. वाद वाढल्यानंतर केंद्र सरकारने कुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. यानंतर त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.


कुमार विश्वास यांच्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. नाव न घेता ते म्हणाले होते की, गाझियाबादमध्ये एक कवी आहे. ज्याने केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यांनी टोमणा मारला आणि म्हणाले की मोदीजी, सर्व एजन्सी काढून टाका आणि त्या कवीला ठेवा. दहशतवादी कोण हे आता तेच कवीच सांगतील. अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, मी तो दहशतवादी आहे, ज्याला भ्रष्टाचारी घाबरतात.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Cancellation of Ride : आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होणार कारवाई
GST News : सामन्यांच्या खिशाला बसणार झळ, अनेक वस्तूंवर GST लागू करण्याचा निर्णय
Covid19 : चिंताजनक! कोरोना विषाणूचा फैलाव वाढला; देशात 20 हजार 139 नवे कोरोनाबाधित, 38 रुग्णांचा मृत्यू रुग्ण