सोलापूर : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे धनगर समाजही एसटी प्रवर्गात समावेश करा, या मागणीसाठी आंदोलन करताना दिसून येत आहे. धनगर समाजाकडूनही विविध ठिकाणी उपोषण करण्यात येत असून पंढरपूर (Pandharpur) येथे गेल्या 8 दिवसांपासून समाज बांधवांचे उपोषण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील एका सरपंच धनगर (Dhangar) बांधवाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, आज सायंकाळी आणखी एका धनगर समाज बांधवाने विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. उपोषस्थळीच ईश्वर वठार येथील संजय चौगुले यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. 


पंढरपूर येथे सहा जिल्ह्यांतील सहा प्रतिनिधी धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उपोषणास बसले आहेत. आठव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने समाज आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत समितीची नेमणूक करण्याचे पुन्हा आश्वासन मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलनस्थळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. त्यातच, धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस असून सरकार बरोबरची बोलणी फीसकटल्याच्या नैराश्यातून उपोषणाच्या ठिकाणी ईश्वर वठार येथील संजय चौगुले यांनी विष प्राशन केले. त्यानंतर, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमरण उपोषणाला बसलेले माऊली हळणवर हे देखील ईश्वर वठार गावचे असून आपल्या बांधवाची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून संजय चौगुले यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. 


योगेश धरम यांनाही आली होती चक्कर


धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजातील नेत्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मागील सात दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी शिष्ठमंडळातील दोन सदस्यांनी करत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणे टाळले. दरम्यान, उपोषणास बसलेल्या पुणे जिल्ह्यातील देहूगावचे योगेश धरम यांना उठताना चक्कर येऊन ते खाली स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर, त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, धनगर आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र होताना दिसत आहे. 


6 जिल्ह्यातील 6 प्रतिनिधींचे उपोषण


धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजातील नेत्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. पंढरपूर येथे सहा जिल्ह्यांतील सहा प्रतिनिधी धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उपोषणास बसले आहेत. सातव्या दिवशीही तोडगा न निघाला नसल्याने समाज आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत समितीची नेमणूक करण्याचे पुन्हा आश्वासन मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलनस्थळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला


हेही वाचा


राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी