Mohan Hambarde : मी विकासकामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भेटलो होतो,  माझ्यासोबत शिष्टमंडळ होते. गडकरी यांची भेट घेतली पण त्यात काही राजकीय चर्चा नव्हती असे मत काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे (Mohan Hambarde) यांनी व्यक्त केलं आहे. माझ्या विरोधात विरोधकांनी षडयंत्र केलं आहे. मी भाजपमध्ये जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे ते म्हणाले. 


दरम्यान, क्रॉस वोटिंगचा आरोप असलेल्या हंबर्डे यांनी मी नार्वेकर यांना मतदान केले आहे. तेव्हासुद्धा बातमी चालली होती. तेव्हा पक्षश्रेष्ठींनी मला असा कुठला समन्स पाठवला नाही. माझ्याबाबत खोटी बातमी चालली होती असंही ते म्हणाले. 


भास्करराव खतगावकर यांचा पक्ष प्रवेशाची बातमी आमच्यापर्यंत नाही - हणमंत पाटील बेटमोगरेकर


दरम्यान, नांदेड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  माजी खासदार भास्करराव खतगावकर काही दिवसांपूर्वी शंकर नगर इथं कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठराव घेत काँगेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर पक्ष प्रवेश कधी आहे विचारल्यास माझ्यापर्यंत बातमी आली नाही तसेच आमच्यापर्यंत तो विषय आला नसल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान, सध्या भास्करराव खतगावकर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशा संदर्भात स्थानिक नेते अनभिज्ञ असल्याचे पाहिला मिळत आहे.