मुंबई: ज्या पक्षाने मला सर्वकाही दिलं त्याच्यासाठी मी लढत राहणार. मी पलायन करणार नाही. पक्षासाठी मी लढायला आणि मरायला तयार आहे. आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो. आज माझा डावा हात काम करत नाही. पण या गोष्टीचे मी कधीही भांडवल केले नाही, असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते मंगळवारी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप म्हणते 2014नंतर भारत स्वतंत्र झाला. भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात खेळखंडोबा केला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजप एकसंध आहे की नाही हे ४ जूननंतर, संजय राऊतांचं वक्तव्य
सध्या पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येणार, अशी हवा असली तरी त्याबद्दल कोणालाही खात्री नाही. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या विजयाची खात्री देऊ शकत नाहीत. तुम्ही मोदींचा चेहरा पाहा, कसा काळवंडला आहे. अमित शाह यांची दाढीही जळाल्यासारखी वाटते. अमित शाह आत्मविश्वासाने जिंकण्याची भाषा करत आहेत. पण घाबरलेल्या माणसाकडेच अतीआत्मविश्वास असतो. आमचे एकनाथ शिंदे बघा, खरी शिवसेना माझीच असे सांगत आहेत. शिवसेना जन्माला आली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत खेळत होते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. पुन्हा सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान मोदी कुठून जागा आणणार? आम्ही राज्यात 30-35 जागा जिंकणार. तर इंडिया आघाडी देशभरात 300 जागा जिंकेल. मोदी आम्हाला मजबूत विरोधी पक्षनेते म्हणून आम्हाला समोर हवे आहेत, अशी टिप्पणी राऊत यांनी केली.
बाळासाहेब आज असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतं: संजय राऊत
मोदींनी मला मुलाखत दिली तर एक प्रश्न विचारेल बाळासाहेबांचं उपकार होते तर त्यांचा पक्ष का तोडला? बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी देशात मोदींविरोधात रान उठवलं असतं, असेही संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल: संजय राऊत
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...