मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाची, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची आणि आत्ताच्या जीआरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या सर्व घडामोडीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी मौन बाळगल्याच्या चर्चा होत्या, मात्र एकनाथ शिंदेंनी यांनी एबीपी माझाच्या गणरायाचे दर्शन घेतले त्यावेळी शिंदेंनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, सगळ्यात आधी मी विघ्नहर्त्याचे आभार मानतो की त्याने सगळी विघ्न दूर केली आहे. वाशीमधे जेव्हा मी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती, तेव्हा तिथून ते परत गेले. मी मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं ते घेऊन ते परत गेले. खरं तर आम्ही त्यांना आरक्षण दिलं होतं, त्यांना प्रश्न विचारा ज्यांनी ते टिकवलं नाही. मी भर स्टेजवर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्यानुसार एसइबीसीचे 10 टक्के आरक्षण दिलं होतं, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं, १३ टक्के आणि १२ टक्के ते आम्ही हायकोर्टात टीकवलं होतं, पण सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. ज्यांना अपयश आलं, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, पण आरक्षण दिलं त्यांना प्रश्न विचारले जात होते.

Continues below advertisement

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र मिळतील

मराठा समाजाला काहीही देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता देणं हीच आम्ही पहिलेपासूनची भूमिका आहे. आम्ही असं आरक्षण दिलं जे कोर्टात टिकलं आणि त्यासंदर्भात मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भरपूर चर्चा केली. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र मिळतील, असा नियम आधीपासूनच आहे. कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही, असंही पुढे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले ते टीम म्हणून घेतले, जनहिताचे निर्णय घेतले. आधीच्या लोकांनी जे स्पीडब्रेकर टाकले होते, विकासाच्या कामांमध्ये ते आम्ही काढून टाकले. अनेक लोकाभिमुख प्रकल्प तातडीने, वेळेच्या आधी मार्गी लावले. मुख्यमंत्री हे राज्याचं प्रमुखपद आहे. मनोज जरांगेंनी समाजासाठी आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. माझ्याबद्दल कोण, काय संशय व्यक्त करतं याचा विचार मी करत नाही. मी कुठलीही गोष्ट लपून छपून करतो, उघडपणे करतो, जे कुणी माझ्यावर असले आरोप करतो त्याला उत्तर देण्याची गरज मला नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.आम्ही एकत्र बैठकीला होतो. सगळे निर्णय आम्ही एकत्र घेतले आहेत. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे सगळे नेते आम्ही एकत्र बसून तोडगे काढलेत. सरकार म्हणून आम्ही जे निर्णय घेतले ते टिकवण्याची आमची जबाबदारी आहे, असंही एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

Continues below advertisement