पुणे: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील निवडणुकीआधी शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. काल(गुरूवारी) हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. अशातच आज दुपारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी म्हटलं आहे, त्यावर आज सांगलीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.


सांगली दौऱ्यावर असताना शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे दुपार पर्यंत काय होतंय बघूया. दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. आज दुपारपर्यंत हर्षवर्धन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. 
 


इंदापूरातील भाजपा कार्यालयाचे फलक हटवले


हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर आता घडामोडींना वेग आला आहे. इंदापूरातील भाजपा कार्यालयाचे फलक हटवले आहेत. शरद पवार हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) भेटीनंतर इंदापुरात घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूर शहरात असणाऱ्या भाजप कार्यालयावरील फ्लेक्स रातोरात हटवण्यात आले आहेत.


हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. इंदापूर शहरातील त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयावरील संपूर्ण फलक हटवण्यात आले असून त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 


मागील अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुतारी फुंकणार अशी चर्चा होती, त्याचबरोबर शरद पवारांसोबत त्यांचे बॅनर देखील लावण्यात आलेले होते, त्यानंतर पाटील कोणता निर्णय घेणार अशा चर्चा सुरू होत्या अशातच त्यांच्या मुलीने देखील याबाबतचे संकेत दिले आहेत.


हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द


1995 साली पहिल्यादा अपक्ष म्हणून आमदार 


1999 आणि 2004 या निवडणुक हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आहेत 


2009 साली हर्षवर्धन पाटील काँगेसच्या चिन्हावर आमदार


1995 ते 2014 पर्यत हर्षवर्धन पाटील मंत्री राहिले


2014 साली आघाडी फुटल्याने हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी केला पराभव


2019 साली आघाडीतून तिकीट मिळत नसल्याच्या कारणावरून भाजपमध्ये प्रवेश


राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती


पुन्हा 2024 मध्ये महायुतीतून तिकीट मिळत नसल्याने पुन्हा एकदा तुतारी हाती घेणार