Harshvardhan Patil, Indapur : "निवडणूका आल्या की  काही यंत्रणा आणि काही जण मला जाणीवूर्वक टार्गेट करीत आहेत. एकटही पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही आघडीत असो किंवा महायुतीत असलो तरी आम्हाला टार्गेट केलं जातंय. हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या क्षितिजावर नको अशी काहींची भूमिका आहे", अशी खदखद माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी व्यक्त केली. ते इंदापुरमध्ये (Indapur) एबीपी माझाशी बोलत होते. 


गावा गावात आम्हाला फिरू दिले जात नव्हतं, तसे प्रयत्न देखील केले गेले


हर्षवर्धन पाटील म्हणाले, आम्ही दादागिरी, अपशब्द वापरत नाहीत, त्रास कधी कुणाला त्रास दिला नाही. निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट केलं जातं. हे षडयंत्र आहे. लोकसभेला आम्ही संघर्ष असताना आम्ही काम केलं. आता वेळ आली की हर्षावधन पाटील यांना एकट पाडायचं. त्यांचे राजकारण संपवण्याचे काम करतात. आता बरेच जन आमच्या विरोधात कट कारस्थानं करतील. इंदापूरची लोकं ठरवतील. आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचा वास आम्हाला येतोय. मध्यंतरी बंदी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. गावा गावात आम्हाला फिरू दिले जात नव्हतं, तसे प्रयत्न देखील केले गेले. आताही तसेच काहीतरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचं हत्यार उपसलं 


हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी बॅनरबाजी केली आहे. 1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 2019 प्रमाणे इंदापूरची जागा सोडणार नाहीत. हर्षवर्धन पाटलांना पुन्हा एकदा दगा देतील हे ओळखूनच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी हे बंडाचा हत्यार उपासलं असल्याचे बोलले जात आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. 1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्यात. अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटलांनी 2019 ला काँग्रेस सोडली होती, पण तेच अजित पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरतील आणि पुन्हा इंदापूरच्या जागेवर दावा करतील हे ओळखूनचं हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता पेटून उठला असल्याच्या चर्चा आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य