जळगाव :  संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी आज जळगावच्या सभेत भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना भाXXX असा शब्द वापरल्याने राजकीय क्षेत्रात गदारोळ उठला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीका केला आहे.  संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस, त्यांना  ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवं, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली आहे. 


 संजय राऊत ही वाया गेलेली केस आहे याला ठाण्याच्या हॉस्पिटल  मध्ये दाखवायला पाहिजे. आम्हाला भाXXX हे म्हणत आहेत मग आमच्यासोबत तुम्ही युती केली होती मग तुम्ही  महाभाXXX नाही का? पणं आम्ही अशी भाषा वापरणार नाही कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण त्यांनी आता अंगावर घेतले आहे तर आम्ही ही उद्याच्या सभेत त्यांना शिंगावर घेणार असल्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना दिला आहे.


निराश, हताश झालेलाच माणूस अशा प्रकारची वक्तव्य करु शकतो: गुलाबराव पाटील


संजय राऊत हे बोलण्यात पटाईत असले तरी त्यांची आजची भाषा संस्कृतीला पकडून नव्हती. त्यांना अजून आमच्या खानदेशाच्या गोष्टी माहित नाही. जेव्हा प्रचाराची वेळ येईल तेव्हा त्यांना खानदेशात काय पिकते हे आम्ही त्यांना दाखवू. त्यांच्या भाषेपेक्षा आमची अत्यंत खालच्या दर्जाची भाषा आहे पण ती आम्ही वापरणार नाही. निराश, हताश झालेलाच माणूस अशा प्रकारची वक्तव्य करु शकतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले. 


पान टपरीवर बसून नाही तर 24 जनतेची सेवा केली म्हणून आमदार; तू काय केले?  गुलाबराव पाटलांचा निशाणा


बाळासाहेबांनी पान टपरीवाल्याला आमदार, मंत्री केले. पण आता या पान टपरीवाल्याला घरी बसविण्याची वेळ आली असे संजय राऊत म्हणाले यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, पान टपरीवर बसून आमदार होता येत नाही.आंदोलन केली, केसेस अंगावर घेतल्या, 24 तास जनतेची सेवा केली. पण तू काय केले? हातात पेन घेऊन सामनात अग्रलेख लिहला आणि दोनदा खासदार झाला. तुम्ही आमच्या भरोशावर खासदार झालात. पाटपरीवाला आमदार झाला तर त्यासाठी मेहनत लागते तू बिना मेहनतीचे धान्य पिकवतोय, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.  


अंगावर आलाय आलाय आता शिंगावर घेणार: गुलाबराव पाटील 


उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील ताईत म्हणून तुम्ही ओळखले जाता त्यामुळे तुम्ही सुसंस्कृत पद्धतीने बोलले पाहिजे. जळगावच्या भूमीत हे तुम्ही बोलून गेला तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्यापेक्षा वाईट बोलू शकतो पण आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवले, त्यांचे संस्कार आहेत. पण आता तुम्ही अंगावर आलाच आहात तर शिंगावर घेणार, असे गुलाबराव पाटील म्हणाली. 


हे ही वाचा :