Chandrashekhar Bawankule On Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात आजची राजकीय वातारण तापलेलं असल्याचं दिसत आहे. राज्यपालांनी माफी मागावी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मोर्चे देखील काढण्यात आले आहेत. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणजे आहेत की, ''राज्यपाल हे संविधानिक पद आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा कमी होईल, अशी विधाने कुणीही करू नये.''


बावनकुळे म्हणाले की, ''राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) शिवाजी महाराज यांच्यावर आधारित अनेक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. इतिहासाचे दाखले आहेत. त्याकाळात जशी परिस्थिती होती, तसा इतिहास लिहिला गेला आहे. भाजपचा मूळ गाभा  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा असून आम्ही तसेच काम करतो.'' काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले आहेत की, सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी जे शब्द काढले तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी. हे विषय काढले जातात. पण माझं मत आहे की, कोणीही शिवाजी महाराज यांची प्रतिमा कमी करण्याचे वक्तव्य करू नये. 


रविवारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर दिसले होते. त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे.  कितीही पक्ष एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपची सर्व निवडणुकीत युती होईल. 


गांधींना मारण्यासाठी गोडसेला सावरकरांनी बंदूक पुरवली, असं वक्तव्य तुषार गांधी यांनी केलं आहे. यावर देखील बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, त्यांची  बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या लोकांना कुणी माफ करणार नाही. कुणाबद्दल बोलत आहेत. रोज राजकीय वातवरण खराब करायचं आहे म्हणून अशी वक्तव्य येत आहेत.


मंत्रीमंडल विस्तार कधी होणार असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्ष नेते शिंदे -फडणवीस सरकारला विचारात आहेत. यावर ते म्हणाले की, त्यांच्या काळात अनेक महीने विस्तार झाला नाही. अधिकारी नेमले नाहीत. शिंदे आणि फडणवीस यांच्यात समन्वय आहे. दोघेही एका घरातले भाऊ असल्याप्रमाणे काम करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेतात म्हणून ते अस्वस्थ आहेत.