मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून त्यांना झेड-प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. मात्र, शरद पवार यांनी सुरक्षा संस्थांनी सांगितलेले काही उपाय अमान्य करत ही सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे. पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय संस्थांनी त्यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) झेड-प्लस सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, धोका काय आहे आणि सुरक्षा का वाढविली जात आहे हे त्यांना कळवलं नसल्याचं कारण देऊन पवार यांनी सुरक्षेसंबंधी काही प्रस्ताव फेटाळला आहे. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांना वाय दर्जाची सुरक्षा वाढवून झेड प्लस सुरक्षा दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयानंतर खुद्द शरद पवारांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. 


शरद पवारांनी सुरक्षा नाकारल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया देताना पुढे त्यांच्या जीवाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवार  (Sharad Pawar) यांनी झेडप्लस सुरक्षा नाकारल्यामुळे पुढे त्यांच्या जीवाला काही झालं तर त्याला  सरकार जबाबदार राहणार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर झेड प्लस सुरक्षेतून त्यांच्यावर पाळत ठेवली जाणार असे शरद पवार यांना वाटत असेल तर हा त्यांच्या नेरेटिव्हचा भाग असू शकतो असेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले आहेत.


शरद पवारांची सीआरपीएफ अधिकाऱ्यांसोबत बैठक 


शरद पवार यांच्या निवासस्थानी काल (शुक्रवारी) सीआरपीएफ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यात आली. त्यावर पवार  (Sharad Pawar) यांनी काही सवाल उपस्थित केले आणि सुरक्षा नाकारली.


काय होते सुरक्षेचे प्रस्ताव?


शरद पवार  (Sharad Pawar) यांनी राजधानीत आपल्या निवासस्थानी अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यास, तसेच दिल्लीत येण्या- जाण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन बदलण्यास आणि प्रवासादरम्यान वाहनात दोन सुरक्षा जवान तैनात करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवली जाणार होती.


झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी  (Sharad Pawar) नाकारल्या आहेत. सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे. तसेच, घरात सुरक्षा कडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, झेड प्लस सुरक्षेप्रकरणी शरद पवारांच्या दिल्लीतील घरी बैठक पार पडली. वाय दर्जाची सुरक्षा वाढवून शरद पवारांना नुकतीच झेड प्लस सुरक्षा बहाल करण्यात आली होती. 


केंद्रानं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना संशय 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत.