बीड : राज्यभरात आज महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले असून, भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) नेते या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. परंतु, बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचाच फोटो नसल्याचे पाहायला मिळाले. यावरून शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजपवर टीका केली होती. याचवेळी गोपीनाथ मुंडे यांचा बॅनरवर (Banner) फोटो नसल्याची बाब भाजप कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली आणि अखेर महायुतीच्या नेत्यांवर बॅनर बदलण्याची नामुष्की आली. 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर तीनही पक्षाच्या नेत्यांची फोटो लावण्यात आली आहेत. मात्र, बीडच्या महायुती मेळाव्याच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचाच फोटो नव्हता. यावरून भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयोजकांनी तात्काळ बॅनर बदलून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असलेला बॅनर लावला. 



शरद पवार गटाची टीका...


दरम्यान, यावरूनच शरद पवार गटाचे नेते महेबूब शेख यांनी भाजपवर टीका केली आहे.“महायुतीच्या बॅनरवर चक्क यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो वापरला, पण स्व.अटल बिहारी वाजपेयी, स्व.गोपीनाथ मुंडे साहेब, स्व. प्रमोद महाजन साहेब यांचा मात्र नवीन भाजपाला विसर पडला आहे. मुंडे साहेब यांनी आपली पूर्ण हयात महाराष्ट्र राज्यात भाजपा वाढवण्यासाठी घातली. भाजपाला बहुजनांचा पक्ष हा चेहरा दिला. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये सुध्दा भाजपाला मुंडे साहेब यांचा विसर पडावा हे अकालणीय आहे. कालच्या बैठकीचे दोन बॅनर पाहायला  मिळाले, पहिल्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे साहेब आहेत, ना पंकजा ताई मुंडे आहेत. दुसऱ्या बॅनरवेळी थोडी लाज शरम म्हणून का होईना, नाईलजाणे महायुती वाल्यांना पंकजा ताई मुंडे यांचा फोटो घ्यावा लागला. यावरुन भाजपाला मुंडे साहेब यांच्या कुटुंबातील व्यक्ती वर प्रेम नाही, मात्र राजकीय पटलावर पंकजा ताई यांची महायुतीला गरज मात्र आहे हे सिध्द होत आहे. भाजपा आणि महायुतीला वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी पुर्ण हयात घालवली. त्यांच्या स्वतःच्या बीड जिल्ह्यात सुध्दा त्याचा फोटोचा विसर पडावा, ही गोष्ट राजकीय विरोधक असताना देखील मनाला न पाटणारी आहे. जो भाजप पक्ष मुंडे साहेब आणि त्यांच्या कुटुंबाचा झाला नाही तो सामान्य बीडकरांचा काय होणार? हा प्रश्न आज बीडच्या जनेतला पडल्याशिवाय राहणार नाही, "असे शेख म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल'