नाशिक : माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात (Accident) झाला असून घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना उडविले. या अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या आहेत. इगतपुरी विधानसभा (igatpuri) मतदारसंघातून त्यांनी 2014 साली आमदारकी मिळवली होती. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता.
नाशिकच्या एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आज समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, कारने अगदी पाठीमागून त्यांना उडवल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
कारचालक 24 तासानंतरही मोकाट
निर्मला गावित यांचा अपघात होऊन 24 तास उलटले तरीही अद्याप वाहनचालक मोकाटच आहे. कायद्याचा बालेकिल्ला बिरुदावली मिळविणारे नाशिक पोलीस काय करत आहेत, असा सवाल गावित यांच्या कन्या नयना गावीत यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे एबीपी माझाशी बोलताना नयना गावित यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. निर्मला गावित यांचा अपघात आहे की घातपात याचा पोलिसांनी शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सोमवार काल सायंकाळी निर्मला गावित यांना एका चारचाकी दिली जोरदार धडक दिल्यानंतर त्या काही फूट अंतरावर फेकल्या गेल्या होत्या. आपल्या नातवाला फेरफटका मारण्यासाठी निर्मला गावित निघाल्या असता त्यांचा अपघात झाला, सुदैवाने नातवाला कोणतीही दुखापत झाली नाही.
कोण आहेत निर्माला गावित
निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.