Santosh Bangar : हिंगोली : कळमनुरी विधानसभेचे शिवसेना (Shiv Sena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात. अशातच सध्या संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयकानं केला आहे. संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर फायरिंग झाल्याच्या चर्चा आहेत. 27 मे रोजी बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचं ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान, असं काहीही झालेलं नाही, काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर 27 मे रोजी फायरिंग झालं असल्याचं ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पौळ यांनी केला आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. अशातच आता त्यांच्या घरासमोरच एका व्यक्तीनं शिवीगाळ करत गोळीबार केला असल्याचा दावाही अयोध्या पौळ यांनी केला आहे. तसेच, सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा सुद्धा सवाल आयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना विचारला आहे. यामध्ये आमदार संतोष बांगर यांना विचारणा केली आसता, काहीही झालेलं नाही, काहीही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. थोडक्यात अशी कोणतीही घटना झाली नसल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे.
ट्वीटमध्ये अयोध्या पौळ यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ बोलताना म्हणाल्या की, "विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शि'वीगाळ अन नंतर फाय'रिंग झाली होती म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?" तसेच, अयोध्या पोळ यांनी आणखी एक ट्वीट केलं असून त्यात लिहिलंय की, "विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुसरी माहिती अशी की प्रकरण दाबून ठेवले जावे म्हणून संतोष बांगर यांच्याकडून काटेकोरपणे पालन केले गेले म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?"
दरम्यान, या आरोपांवर आमदार संतोष बांगर यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं काहीही झालेलं नाही, काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.