मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यावेळी, भाषण करताना आता मागे हटणार नाही, सककारने गोळ्या घातल्या तरी चालतील पण आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना गोळ्या घालणं हे सरकारचं काम नाही. कुणाचही आरक्षण (Reservation) कमी न करता, कुणालाही नुकसान न होऊ देता, जे योग्य आणि शक्य आहे ते सरकार करेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिली. यावेळी, त्यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. 

Continues below advertisement

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मी दिलं, कुणबी नोदीं केल्या. मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम शिंदे समिती आजही करत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले ते हायकोर्टात टिकले. मात्र, सुप्रीम कोर्टात काही लोकांमुळे ते टिकलं नाही. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा त्यांनी बाजू मांडायला पाहिजे होती, ती त्यांनी मांडली नाही. राज्यात माझं सरकार आलं तेव्हा मी 10 टक्के आरक्षण दिलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. आपण मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही शिंदेंनी म्हटले.  

ओबीसी समाजाचं आरक्षण काढून किंवा इतर कुठल्याही समाजाचे काढून मराठा समजाला आरक्षण देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते देण्याची भूमिका सरकारची आजही आहे. ज्या सुविधा ओबीसी समाजाला मिळतायेत त्या मराठा समाजालाही आम्ही देतो. जे योग्य आहे, नियमात बसतंय, त्यासाठी सरकार अजूनही सकारात्मक आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली.  

Continues below advertisement

गोळ्या घालायचं काम सरकारचं नाही

कुणाचही आरक्षण कमी न करता, कुणाचही नुकसान न करता आरक्षण देण्याची तयारी आहे. गोळ्या घालण्याचा काम सरकारचं नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. जे आम्ही दिले त्यावर हे टिका करतात, पण त्यांनीच हे आरक्षण टिकवलं नाही. विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, आम्ही बैठकीला बोलवल्यावर विरोधक बैठकीलाही येत नाहीत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजावर सरकार कुठलाही अन्याय करणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

हरभजन सिंगने घेतली एकनाथ शिंदेंची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजन सिंह दाखल झाला होता. खासदार क्रीडा संग्राम स्पर्धेच्या निमित्ताने आज ठाणे येथे आले असता हरभजन सिंह यांनी शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढवण्यासह तरुण खेळाडूना उत्तमोत्तम प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने चर्चा करण्यात आली. तर, यावेळी उल्हास नगर महापालिका क्षेत्रातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत, त्यासाठी त्यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. शेखर यादव माजी नगरसेवक ठाकरे गट, संगीता सपकाळे माजी नगरसेवक ठाकरे गट आणि इतर विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, उपशाखा प्रमुख देखील पक्ष प्रवेश करणार आहेत. 

हेही वाचा

आधी गरागरा फिरवली, हाततली कांद्याची माळ अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न; दोघे पोलिसांच्या ताब्यात