Lok Sabha Election Result 2024 Updates  : मुंबई : यंदा राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aaghadi) धुरळा उडवला असून महायुतीला (Mahayuti) केवळ 17 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. यंदाची राज्यातील लोकसभा निवडणूक खऱ्या अर्थानं शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) अशी होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पक्षफुटीनंतर शिवसेना (Shiv Sena) दोन गटांत विभागली गेली. त्यानंतर दोन्ही गटांत अस्तित्वाची लढाई झाली, ज्यात शिंदेंचा विजय झाला. ठाकरेंनी पक्षाचं नाव, पक्ष चिन्ह सगळंच गमावलं. यंदाची निवडणूकही ठाकरेंनी नवं नाव आणि चिन्हासह लढवली. अशातच राज्यात लोकसभेत ठाकरेंची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. पण तरीदेखील या निवडणुकीत शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं पाहायला मिळालं. 

ठाकरेंपेक्षा शिंदेंचा स्ट्राईक रेट जास्त

शिवसेना शिंदे गटानं 7 जागांवर विजय मिळवला. तर, ठाकरेंच्या शिवसेनेचा 9 जागांवर विजय झाला. पण जर शिंदेंनी लढवलेल्या जागा आणि ठाकरेंनी लढवलेल्या जागांचा विचार केला, तर ठाकरेंच्या तुलनेत शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं पाहायला मिळालं. शिंदेंनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 15 जागा लढवल्या होत्या. 15 पैकी 7 जागांवर शिंदेंचे शिलेदार निवडणून आलेत. तर, ठाकरेंनी महाराष्ट्रात 21 जागा लढवलेल्या त्यापैकी 9 जागांवर विजय मिळाला आहे. 

6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, तर दुसरीकडे दोन नवनिर्वाचित खासदार शिंदेंच्या संपर्कात, दाव्यात कितपत तथ्य? 

लोकसभेच्या रणधुमाळीचं वारं कुठे शमतं न शमतं, तोच पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल शिंदेंचे पाच ते सहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी एबीपी माझाला दिली होती. तर, आज शिंदेंचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंचे नुकतेच निवडून आलेले दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत कोणाचा दावा खरा आणि कोणाचा दावा खोटा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदे यांचे नवनिर्वाचित खासदार कोण? 

  1. रवींद्र वायकर विजयी (उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक 2024)
  2. प्रतापराव जाधव विजयी (बुलढाणालोकसभा निवडणूक 2024)
  3. संदिपान भुमरे विजयी (औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2024)
  4. श्रीरंग बारणे विजयी (मावळ लोकसभा निवडणूक 2024)
  5. श्रीकांत शिंदे विजयी (कल्याण लोकसभा निवडणूक 2024)
  6. नरेश म्हस्के विजयी (ठाणे लोकसभा निवडणूक 2024)
  7. धैर्यशील माने विजयी (हातकणंगले लोकसभा निवडणूक 2024)

शिंदेचे किती खासदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत? 

  1. राहुल शेवाळे पराभूत (दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2024)
  2. यामिनी जाधव पराभूत (दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक 2024)
  3. राजश्री पाटील पराभूत (यवतमाळ - वाशिम लोकसभा निवडणूक 2024)
  4. बाबूराव कदम पराभूत (हिंगोली लोकसभा निवडणूक 2024)
  5. हेमंत गोडसे पराभूत (नाशिक लोकसभा निवडणूक 2024)
  6. सदााशिव लोखंडे पराभूत (शिर्डी लोकसभा निवडणूक 2024)
  7. राजू पारवे पराभूत (रामटेक लोकसभा निवडणूक 2024)
  8. संजय मंडलिक पराभूत (कोल्हापूर लोकसभा निवडणूक 2024)

Lok Sabha Election Result 2024 Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचा निकाल काय? 

मतदारसंघ  उमेदवार (शिवसेना शिंदे गट) विरोधी पक्षातील उमेदवार  कोण विजयी/पराभूत? (शिंदे गट)
उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) रवींद्र वायकर विजयी
दक्षिण मध्य मुंबई  राहुल शेवाळे अनिल देसाई (ठाकरे गट) राहुल शेवाळे पराभूत 
दक्षिण मुंबई  यामिनी जाधव  अरविंद सावंत (ठाकरे गट) यामिनी जाधव पराभूत 
बुलढाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) प्रतापराव जाधव विजयी
यवतमाळ - वाशिम   राजश्री पाटील संजय देशमुख (ठाकरे गट)  राजश्री पाटील पराभूत 
हिंगोली  बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) बाबूराव कदम पराभूत 
छत्रपती संभाजीनगर संदिपान भुमरे चंद्रकांत खैरे (ठाकरे गट) संदिपान भुमरे विजयी 
नाशिक हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) हेमंत गोडसे पराभूत 
शिर्डी  सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) सदााशिव लोखंडे पराभूत 
मावळ  श्रीरंग बारणे संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट) श्रीरंग बारणे विजयी 
कल्याण  श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर (ठाकरे गट) श्रीकांत शिंदे विजयी
ठाणे  नरेश म्हस्के राजन विचारे (ठाकरे गट) नरेश म्हस्के विजयी
हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील (ठाकरे गट) धैर्यशील माने विजयी
रामटेक  राजू पारवे शामकुमार बर्वे (काँग्रेस)  राजू पारवे पराभूत 
कोल्हापूर  संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) संजय मंडलिक पराभूत 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Politics: ठाकरेंचे दोन नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात, नरेश म्हस्केंचा दावा; उद्धव ठाकरेंच्या खासदारांची संपूर्ण यादी!