Maharashtra Politics: मुंबई: दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत थोडाफार फटका बसला. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या 15 जागांपैकी केवळ 7 जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचा समावेश असलेल्या महायुतीचीही या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत 9 खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिष्मा काय असल्याचे दाखवून दिले होते. मात्र लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. आज शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. नरेश म्हस्के यांच्या या दाव्यानंतर ठाकरेंच्या 9 नवनिर्वाचित खासदारांपैकी नेमके कोणते दोन खासदार संपर्कात आहे, याबाबत सध्या चर्चा रंगली आहे. 


उद्धव ठाकरेंच्या खासदारांची यादी- (Uddhav Thackeray MP List)


1) अरविंद सावंत- दक्षिण मुंबई लोकसभा


2) अनिल देसाई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा


3) संजय दीना पाटील- ईशान्य मुंबई लोकसभा


4) संजय जाधव- परभणी लोकसभा


5) ओम राजेनिंबाळकर- धाराशिव लोकसभा


6) भाऊसाहेब वाकचौरे- शिर्डी लोकसभा


7) राजाभाऊ वाजे- नाशिक लोकसभा


8) संजय देशमुख- यवतमाळ-वाशीम लोकसभा


9) नागेश पाटील-आष्टीकर- हिंगोली लोकसभा


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार (Uddhav Thackeray MLA List)


1) अजय चौधरी
2) आदित्य ठाकरे
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर 
11) कैलास पाटील
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील


नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?


लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे.


संबंधित बातमी:


ठाकरेंच्या संपर्कात असलेल्या आमदारांची संख्या 40 ही असू शकते; सचिन अहिर यांचा खळबळजनक दावा