Eknath Shinde and BJP, Mumbai : महाराष्ट्राच्या महायुतीतील मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेले महाराजकीय नाट्य अखेर काल आझाद मैदानावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री पदी घेतलल्या शपथविधीनंतर संपल ?, शपथविधीच्या पूर्वी ३ तास या नाराजी नाट्याला वेग आला होता. शपथविधीला शेवटचा एक तास उरला असताना. उपमुख्यमंत्रिपदाचे पत्र शिंदेंनी भाजप नेत्यांच्या वाटाघाटीनंतर राज्यपालांना आमदारांमार्फत सुपूर्द केले. योग्य तो मानपान यावरूनच या नाराजी नाटयाला पूर्णविराम लागल्याची चर्चा सर्वत्र आहे.
गिरीश महाजनांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांना वर्षाच्या फेऱ्या माराव्या लागल्या
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कारभार पहात होते. मात्र बहुमाताच्या आकड्याच्या जवळ पोहचलेल्या भाजपकडून सत्तेकडे पाऊलं उचलताना शिंदेंकडे कानाडोळा केल्याची चर्चा आहे. शपतविधीच्या तारिख परस्पर बावनकुळेंनी जाहिर करणं, शपथविधीच्या पाहणी दौऱ्यात सहकाऱ्यांना डावलणं यातून नकळत शिंदे दुखावल्याची चर्चा सुरू असताना. गृहमंत्री पद सोडण्यास भाजपने नकार दिल्यानंतर तर शिंदेंनी फास आवळला. त्यानंतर गिरीश महाजनांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत (Devendra Fadnavis) अनेकांना वर्षाच्या फेऱ्या माराव्या लागल्या...मात्र या नाराजी नाट्यबाबत ही शिवसेना आमदारांकडून शिंदे नाराज नसल्याच्या चर्चांवर सारवा सारव आजही सुरूचं आहेत.
अखेर भाजपकडून गृहखात्या ऐवजी शिंदेंपुढे तीन पर्याय ठेवण्यात आले
शिंदे उपमुख्यमंत्री पदी शपथ घेत नव्हते. त्यामुळेच त्याची समजूत काढण्यासाठी गेल्याची कबूली स्वत: फडणवीस यांनी दिली. महायुतीत मागच्यावेळी देवेंद्र उपमुख्यमंत्री पद होते. मग नियमानुसार जर शिवसेनेच्या वाट्याला जर का ? उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर गृहमंत्री पदही मिळायला हवे असा आग्रह शिवसेनेचा होता. मात्र गृहखात शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार नसल्यामुळे नाराजी नाट्याला सुरूवात झाली. अखेर भाजपकडून गृहखात्या ऐवजी शिंदेंपुढे तीन पर्याय ठेवण्यात आल्याचे कळते. यात महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा या खात्याचा पर्यात ठेवण्यात आला असल्याचे कळते. गृहखात्याबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. तसेच भाजप पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द या आश्वासनावर शिंदेचं नाराजी नाट्य संपल्याची चर्चा आहे. सध्या शिंदेपुढे भाजपने ठेवलेल्या तीन खात्यांबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे कळते.
इतर महत्त्वांच्या बातम्या