Buldhana News बुलढाणा : प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव असलेल्या चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचे पती विद्याधर महाले हे निवडणूक आचारसंहिता असतानाही राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असल्याची आणि या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनगर येथील माजी सरपंच असलेल्या मनोज लाहुडकर यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) हि तक्रार केली होती.

Continues below advertisement

Election Commission : निवडणूक आयोगाकडे तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश 

दरम्यान, या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे. विद्याधर महाले हे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती असून ते प्रशासकीय सेवेत आहेत. तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी हजेरी लावून भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहन केल्याचा आरोपही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे. सोबतच तशी तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.याशिवाय चिखली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले काँग्रेसचे काशिनाथ बोंद्रे यांनीही अशाच प्रकारची तक्रार केल्याने आता निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतो? हे बघणे महत्त्वाचे आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमचा हातात, CM फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता प्रफुल पटेलांचं वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या दोघांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं म्हणतं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेलांनीही उडी घेत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे असून लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बहिणींचा योग्य सन्मान केल्या जाईल. आणि आता जे मानधन दिल्या जातं आहे, त्यात आणखी वाढ करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं. भंडारा शहरात राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात असल्याचं वक्तव्य यापूर्वी अजित पवार, रूपाली चाकणकर यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. त्यात आता प्रफुल पटेलांची भर पडल्याच बघायला मिळाल्यानं महायुतीतील नेत्यांमध्ये जणू स्पर्धा सुरू झाली की, कायं असं वाटतय.

इतर महत्त्वाच्या बातम्या :