Eknath Khadse: नागपूर येथील दंगल प्रकरणाची पोलीस विभागाकडून कसून चौकशी सुरू आहेत. हा प्रसंग संपुर्ण देशाचं लक्ष वेधण्याचं प्रसंग आहे. नागपूर सारख्या शांतताप्रिय शहरात बाहेरून लोक येवून दंगल घडवितात. यात मालेगाव कनेक्शन जर असेल तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ही दंगल पुर्वनियोजित आहे तर सरकार नेमकं काय करत होते?, याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती. सरकार जर सांगत असेल की ही दंगल पूर्वनियोजन आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सरकारवर केली. मोठ्या प्रमाणात ट्रॉली मधून दगड आणले होते जर असं सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस एलसीबी काय करत होते?, हा मोठा प्रश्न आहे. गृहका त्याने काळजी घेतली असती तर कदाचित या दंगलीची तीव्रता कमी राहिली असती. असा सवालही खडसेंनी केलाय. दरम्यान, राज्यात दिशा सालियन, औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिलांचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळ विधानसभेत चर्चा होते? असा सवालही त्यांनी केलाय. जळगावमधून ते बोलत होते.
तुमची उणीदुणी बाहेर सोडवता आली असती..एकनाथ खडसेंची सरकारवर हल्लाबोल, औरंगजेब, दिशा सालियान प्रकरणावरून खरडपट्टी
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | Mukta Sardeshmukh | 23 Mar 2025 04:24 PM (IST)
महिलांचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळ विधानसभेत चर्चा होते? असा सवालही त्यांनी केलाय.
Eknath Khadse